गुहागर, ता. 29 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) सोमवार, दि. २७ रोजी इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. ‘Social Justice Day’ in KDB college
या वेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये सौ.रश्मी आडेकर यांनी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्यायदिवस’ म्हणून महाराष्ट्र शासन २००३ पासून हा दिवस साजरा करत असल्याचे सांगितले. याचे स्पष्टीकरण करताना राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेली सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व विश्वास यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता ही उद्दिष्टे छ. शाहूमहाराजांनी आपल्या कारभारात प्रत्यक्षात आचरणात आणून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे हा विचार पुन्हा रुजावावा. पुढे चालू राहावा यासाठी जयंतीचे प्रयोजन असल्याचे सांगितले. तसेच छ.शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग विषद केले. ‘Social Justice Day’ in KDB college
या कार्यक्रमाचा समारोप करताना प्राचार्य श्री.पद्मनाभ सरपोतदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अवघे ४८ वर्षें आयुष्य मिळालेल्या छ.शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील योगदान आजही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर फलक लेखन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील ११ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व २९ विद्यार्थी वर्ग उपस्थित होता . सौ .आडेकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘Social Justice Day’ in KDB college