• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मी वाचनालयात महिलांच्या समस्यांबाबत परिसंवाद संपन्न

by Manoj Bavdhankar
June 1, 2023
in Guhagar
109 1
0
Seminar on Women's Issues at Jnanarashmi Library
214
SHARES
612
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : प्रकृति फाऊंडेशन आणि गुहागर शहर महिला मंडळ यांच्यातर्फे दि. 30 मे रोजी ज्ञानरश्मी वाचनालयात परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांचे आरोग्य आणि सॅनेटरी पॅड चे व्यवस्थापन महिलांनी पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टिकोनातून घराच्या घरी कसे करावे. याबाबत प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली.  Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

गुहागर शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम महिलांनी महिलांसाठी घडवून आणला होता. मासिक पाळी संदर्भात गैरसमजुती आणि मुली आणि स्त्रियांचे आरोग्य तसेच घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता याबाबतचे मार्गदर्शन चिपळूणच्या सुप्रसिध्द स्रिरोग तज्ञ डॉ. सुनेत्रा खातू यांनी केले. तसेच सॅनेटरी पॅड मुळे होणारे पर्यावरणीय धोके लक्षात घेता आपण घरच्या घरी याचे खत तयार करण्यासाठीच्या उपक्रमाची माहिती प्रकृति फाऊंडेशनच्या मिलन जंगम यांनी दिली. यासाठी मातीचे माठ व माती आणि शेणाच पाणी टाकून नैसर्गिक रित्या घरच्या घरी बागेत पॅड डिस्पोज कसे करावे व त्यापासून खत  कसे  करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना तहसीलदार प्रतिभा वराळे मॅडम म्हणाल्या की, ‘हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून खरतर शाळा, कॉलेज मध्ये असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. प्रकृति फाऊंडेशनच्या माध्यमातून महीलांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम आयोजित करावेत.’ Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library 

या उपक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. पारिजात कांबळे आणि सौ. मिलन जंगम (प्रकृति फौंडेशन) यांनी केले होते. तर राजेंद्र आरेकर, शामल आरेकर, उमा बारटक्के, सोनाली घाडे, शामली घाडे यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी गुहागर शहरातील अनेक महिला मंडळातील महिलांनी सहभाग नोंदवला. यासाठी ज्ञानरश्मी वाचनालयाने विशेष सहकार्य केले. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

Share86SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.