• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एस.टी. संपावर तोडगा निघणार?

by Mayuresh Patnakar
March 10, 2022
in Maharashtra
18 0
0
ST Strike

ST Strike in Guhagar

35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विधान परिषद सभापतींच्या दालनात झाली सर्वपक्षीय बैठक

गुहागर, ता. 9 : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना बुधवारी (ता. 9) सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Legislative Council Speaker Ramraje Nimbalkar) यांच्या दालनात महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक झाली. या एस.टी. महामंडळाचे विलिनीकरण व एस.टी. कामगारांच्या अन्य मागण्यांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास चार महिने सुरु असलेल्या एस.टी. कामगारांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. S.T. strike Will  be resolved?

या बैठकीला परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Transport Minister Anil Parab), भाजपचे (BJP) आमदार (MLA)  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Cabinet Minister Jayant Patil, आमदार दिवाकर रावते (Divakar Rawate), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सुधीर तांबे (Sudhir Tambe), परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळ, एस.टी. कामगारांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. असे विश्र्वसनीय वृत्त आहे. S.T. strike Will  be resolved?

S.T. strike Will  be resolved?
Next hearing of the ST strike is on Friday

एस.टी. संपावर तोडगा निघणार? (S.T. strike Will  be resolved?)

या बैठकीमध्ये एस.टी. महामंडळाचे विलिनीकरण (Merger of MSRTC) होणे शक्य नसले तरी एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) पगारवाढ देण्याबाबत, संपात सहभागी झालेल्या कामगारांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत, राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे बढती, निलंबन, बडतर्फी, सेवाज्येष्ठता आदी समस्यांवर जलदगतीने निर्णय होण्यासाठी मॅट कोर्ट (Maharashtra Administrative Tribunal) सुरु करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. S.T. strike Will  be resolved?

आज झालेल्या बैठकीचे निवेदन गुरुवारी (ता. 10) परिवहन मंत्री अनिल परब विधान परिषदेच्या सभागृहात (Legislative Council) ठेवणार आहेत. या घडामोडींमुळे एस.टी.चा संपावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. S.T. strike Will  be resolved?

दरम्यान त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कोर्टासमोर आल्यानंतर कोर्टाने या अहवालावर मंत्रीमंडळात चर्चा करावी असे मत मांडत त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत 11 मार्चला संपत आहे. 11 मार्चला पुन्हा एकदा कोर्टासमोर या विषयाची सुनावणी होणार आहे.

आपण एस.टी. कर्मचारी विलास मोरे यांनी बनविलेल्या एस.टी.च्या प्रतिकृतीचा व्हिडिओ पाहिला आहे काय  नसेल तर अवश्य पहा.

Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.