• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

by Mayuresh Patnakar
December 14, 2021
in Guhagar
16 0
0
विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

डॉ. अनिल जोशींनी पुष्पगुच्छ देवून डॉ. नातूंसह भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा बँक निवडणूक : डॉ. जोशींनी मानले आभार

गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत गुहागर तालुका वि.का.स.  संस्था मतदार संघातून डॉ. जोशी विजयी झाले. यामध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याबद्दल डॉ. जोशींनी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.Dr. Anil Joshi won the election for the post of Director of Ratnagiri District Central Bank from Guhagar Taluka Co-operative society constituency. The role of BJP became important in this Victory. About it Dr. Joshi thanked North Ratnagiri District President, former MLA Dr. Vinay Natu and other BJP workers.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुहागर तालुक्यातील वि.का.स. संस्था मतदार संघातून निवडून येण्याचे मोठे आव्हान होते. सहकार पॅनेलचे उमेदवार असलेल्या डॉ. अनिल जोशी यांच्यासमोर गेली अनेक वर्ष राजकारण आणि सहकारात सक्रीय असलेले चंद्रकांत धोंडू तथा आबा बाईत यांच्यासारखा मातब्बर उमेदवार उभा होता. आबांना आमदार भास्कर जाधव यांनी देखील सक्रीय पाठिंबा दिला होता. शिवाय वि.का.स. संस्थांमधील जानवळे, चिखली, पेवे, पालशेत, अंजनवेल, कोळवली, शीर, मुंढर या 8 विकास संस्थांचा मतदान प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी तांत्रिक कारणांमुळे बाद झाले होते. त्यामुळे तालुक्यातील वातावरण सहकार पॅनेल, डॉ. तानाजी चोरगे यांच्या विरोधात बनले होते.

अशा परिस्थिती भाजपच्या 6 मतदार प्रतिनिधींची मते डॉ. अनिल जोशी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. सर्व बाजुनी सर्व प्रकारचा दबाव असूनही हे मतदार प्रतिनिधी पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यामुळेच गुहागर तालुक्यातील वि.का.स. संस्था मतदारसंघात सहकार पॅनेलच्या अनिल विठ्ठल जोशी यांनी 21 मतांपैकी 13 मते मिळवत  चंद्रकांत धोंडू बाईत (8 मते) यांचा 5 मतांनी पराभव केला.

भाजपने दिलेली साथ डॉ. जोशी यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. त्यामुळे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू गुहागरमध्ये आहेत असे कळल्यावर डॉ. जोशी गुहागरला आले. त्यांनी डॉ. नातूंची भेट घेऊन आभार मानले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक व अन्य पदाधिकारी यांची व्यक्तीश: भेट घेवून सर्वांचे आभार मानले.

यावेळी गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, लक्ष्मी कानडे,मृणाल गोयथळे, अरुण रहाटे, आरेगावचे उपसरपंच साईनाथ कळझुणकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजय मालप, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक शार्दूल भावे यांच्यासह  नरेंद्र वराडकर, ज्योती परचुरे, नेहा वराडकर, संगम मोरे, हेमंत बारटक्के, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगाची क्षणचित्रे पहाण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.