मंत्री उदय सामंत : जिल्हाधिकारी बुधवारी घोषणा करतील
रत्नागिरी, ता. 21 : जिल्ह्यामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का 10 टक्केपेक्षा कमी आहे. तसेच ऑक्सिजन बेडची उपलब्धताही 50 टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही निर्बंध शिथिल होतील. त्याची घोषणा बुधवारी (ता. 23) रोजी जिल्हाधिकारी करतील. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.
In Ratnagiri district Corona Positivity Rate is less than 10 % percent now. Also more than 50% Oxygen Beds available now. This will relax some of the restrictions in the district. It will be announced by the Collector on Wednesday (23rd June). Told Minister of Higher and Technical Education, Uday Samant in Press Conference.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत म्हणाले की, निर्बंध उठवताना राज्य सरकारने 5 टप्पे जाहीर केले होते. या टप्प्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा 4 थ्या टप्प्यात होता. मात्र आता रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग हे दोन्ही जिल्हे 3 टप्प्यात आले आहेत. आपल्या जिल्ह्यात साडेसात हजारापेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट 8.61 % इतका कमी आहे. तसेच जिल्ह्यातील 60% ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबत आजच्या बैठकीत तत्वत: मान्यता मिळाली आहे. बुधवारी (ता. 23) जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण शुक्ला याबाबतचा निर्णय आणि निर्बंधांमध्ये कोणती शिथिलता येणार त्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करतील. मात्र निर्बंध शिथिल केले म्हणजे जिल्ह्यातील कोरोना संपला असे समजू नये. अजुनही दोन महत्त्वपूर्ण टप्पे आपल्याला पार करायचा आहेत. कोरानेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे भान आणि सॅनिटायझेशन याबाबत काटेकोरपणे काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.
डेल्टा प्लसची अफवा पसरविणारा शोधून काढणार
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कुठेही डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव झालेला नाही. ही चुकीची माहिती कोठुन मिळाली, कोणी दिली याचा शोध घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. अशा अफवांमुळे जिल्ह्याची बदनामी होते. जिल्हावर निर्बंध लादण्याच्या शक्यता निर्माण होतात. असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यास सज्ज
तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होईल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी उपलब्ध करुन आपण रत्नागिरीत 173 बेडची लहान मुलांसाठी 3 कोविड केअर सेंटर तयार केली आहे. येथे मुलाच्या शिक्षणाची आणि करमणुकीची व्यवस्थाही आहे. मात्र कोविड केअर सेंटरचा हा निधी फुकट गेला तरी चालेल पण तिसरी लाट येऊच नये. अशी प्रार्थना आम्ही परमेश्र्वराकडे करत आहोत.