• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटी महामंडळात १७ हजार जागांवर होणार भरती

by Guhagar News
September 20, 2025
in Old News
285 2
0
एसटी महामंडळात १७ हजार जागांवर होणार भरती
559
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

मुंबई, ता. 20 : एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून १७ हजार ४५० कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. Recruitment to be held in ST Corporation

एसटी महामंडळाच्या ३०० व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर पुढील ३ वर्ष हा करार असेल. ३ वर्षांसाठी ही एसटीतील कंत्राटी भरती असेल. एसटीकडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण-तरुणींना एसटीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरच त्यांना सहाय्यक आणि चालक या पदांसाठी रुजू केलं जाईल. एसटीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या २ ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या ई-निविदा प्रक्रियेसाठी सहा प्रादेशिक विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. Recruitment to be held in ST Corporation

Jakhadi Festival in Guhagar

या कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. एसटीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील अनेक बेरोजगारांना मोठी संधी आहे. १७ हजार ४५० तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ८ हजार नवीन बससाठी मनुष्यबाची आवश्यकता असते. अशात एसटी महामंडळात मोठी भरती होणार आहे. एसटी महामंडळात दरवर्षी जवळपास १००० च्या संख्येत इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. अशा एसटी सेवा सुरळित ठेवण्याची आवश्यकता आहे. अशात बसेसच्या देखभालीसाठी, तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालक, सहाय्यक अशा मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच कंत्राटी पद्धतीने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. Recruitment to be held in ST Corporation

Share224SendTweet140
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.