रत्नागिरी, ता. 25 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल व्हिडिओतून पाहिले. याची दखल पीएमओने घेतली असून या व्हिडिओ आणि सेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागणाऱ्या एसपींची सीबीआय चौकशी करण्याची भाजपने मागणी केली आहे. अशी माहिती जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात 25 ऑगस्टला रात्री प्रमोद जठार यांची पत्रकार परिषद झाली. प्रमोद जठार यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (ता. २७) रत्नागिरीतून सुरू होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा रत्नागिरीत प्रवास करेल. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस यात्रा करून सांगता होईल. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते. Maharashtra Government Cabinet Minister & Guardian minister of Ratnagiri District Anil Parab convened a meeting of DPDC to prevent Officers attendance in Riview Meeting called byUnion Minister Narayan Rane. But the public saw in the viral video, what Anil Parab did in this meeting. The PMO has taken note of this. The BJP has demanded a CBI enquiry on this video. This information was given by Pramod Jathar, organizer of Jan Ashirwad Yatra, in a press conference held 25 th Augest.