• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रुपाली शिंदे व श्वेता शिंदे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

by Ganesh Dhanawade
June 10, 2025
in Guhagar
64 1
0
126
SHARES
359
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी रुपाली जयसिंग शिंदे व अंगणवाडी शिंदेवाडी येथील अंगणवाडी सेविका श्वेता सुधाकर शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.  वरवेली ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. Punyashloka Ahilyadevi Holkar Award

Minor girl kidnapped from Ratnagiri

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. Punyashloka Ahilyadevi Holkar Award

या कार्यक्रमाला सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, सेजल शिंदे, माजी सरपंच सुप्रिया देसाई, माजी उपसरपंच धनश्री चांदोरकर, बौद्धवाडी अध्यक्ष व ज्येष्ठ कवी बाळकृष्ण पवार, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, जयसिंग शिंदे, प्रा.राधा शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे, प्रसाद विचारे, सायली करंदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड यांनी केले तर आभार सरपंच नारायण आगरे यांनी मानले. Punyashloka Ahilyadevi Holkar Award

Share50SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.