पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा
गुहागर, ता. 13 : श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड आयोजित पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा 2022 या स्पधेमध्ये कला विकास रंगभुमीने सादर केलेल्या संगीत स्वयंवर मधील नाट्यप्रवेशाने प्रथम क्रमांक मिळवला. याच नाट्यप्रवेशातील रुक्मिणीची भूमिका करणाऱ्या कु. प्रियांका तांबेने उत्कृष्ट गायिकेच पारितोषिक मिळवले. Prize Distribution Ceremony
गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंडाने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यक्ष संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये दापोली, गुहागर व रत्नागिरी तालुक्यातील 6 नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कलाविकास रंगभुमीच्या संगीत स्वयंवर या नाट्यप्रवेशाने जिंकले. त्यांना रु. 15 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. Prize Distribution Ceremony

द्वितीय क्रमांकचे पारितोषिक कलाविकास रंगभुमीच्या संगीत सुवर्णतुला या नाट्यप्रवेशाने मिळविले. या संघाला रु. 10 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. Prize Distribution Ceremony

तृतीय क्रमांकाचे बक्षिस लक्ष्मी नारायण नाट्य मंडळ वाघांबेने सादर केलेला संगीत संशयकल्लोळ मधील नाट्यप्रवेशाने मिळविले. त्यांना रोख रु. 7 हजार आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेतील उत्कृष्ट गायकाचे पारितोषिक संगीत संशयकल्लोळ नाट्यप्रवेशात अश्विनशेठची भुमिका करणाऱ्या अजिंक्य पोंक्षे यांनी मिळविले. तर संगीत स्वयंवर या नाट्यप्रवेशातील रुक्मिणीची भूमिका करणारी कु. प्रियांका तांबेची निवड उत्कृष्ट गायिका म्हणून करण्यात आली. या दोघांना प्रत्येकी 1 हजार रु. रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.Prize Distribution Ceremony

बक्षिस वितरणाचे समारंभाला परिक्षक मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर व विवेकानंद जोशी, दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, कोपरी नारायण देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर, मुंबईचे संदीप वैद्य उपस्थित होते. Prize Distribution Ceremony या स्पर्धेसाठी पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. ठाणे, उमेश साठे व संदीप वैद्य मुंबई, बोरोसिल कंपनीचे विनायक पाटणकर व ओंकार दातार, मँगो व्हिलेजचे समीर काळे, युनियन बँक ऑफ इंडिया गुहागरचे शाखा व्यवस्थापक प्रसन्न दामले, विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लोटे, वरंडे विमा सेवा, यांचे आर्थिक साह्य लाभले.
Tags : Theater artists, Rangbhumi, Marathi Rangbhumi, नाट्यकलाकार, मराठी रंगभुमी, theaterarts, marathiplay, पं. गोविंदराव पटवर्धन, Musical Drama, संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा, Competition, Opening Ceremony, बक्षिस वितरण समारंभ, Prize Distribution Ceremony
