• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रीती झगडे ठरली स्टुडंट ऑफ दि इयर

by Ganesh Dhanawade
October 17, 2021
in Old News
16 0
0
प्रीती झगडे ठरली स्टुडंट ऑफ दि इयर
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील प्रीती प्रभाकर झगडे खरे ढेरे महाविद्यालयातील सुक्ष्म जीवशास्त्र विभागातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ठरली आहे. मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉलेज युनिट तर्फे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून प्राचार्य सावंत यांनी प्रीती झगडेचा गौरव केला. Preeti Prabhakar Zagde of Khare-Dhere-Bhosle College here has become the best student in the Department of Microbiology of Khare Dhere College. Principal Sawant honored Preeti Zagde by presenting a memento and certificate on behalf of the College Unit of the Microbiologist Society of India.

कोरोना संकटातही सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या सर्व उपक्रमांमध्ये  प्रीती झगडेचा सहभाग होता. खरे ढेरे भोसले महाविद्यालयात सुक्ष्म जीवशास्त्र विभागामध्ये मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे युनिट आहे. विद्यार्थ्यांना सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचा अधिक अभ्यास करता यावा. संशोधनाची आवड निर्माण व्हावी.  म्हणून या युनिट द्वारे विविध प्रकल्प पूर्ण करण्याचे काम विद्यार्थ्यांना दिले जाते. यामध्ये ही प्रीती झगडेने कौतुकास्पद कामगिरी केली. त्यामुळे मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या युनिट अंतर्गत स्टुडंट ऑफ दि इयर या पुरस्कारासाठी प्रीती झगडेची केली.

मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. ए. एम. देशमुख, आणि महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटणकर यांनी कौतुक केले. मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र  देण्यासाठी महाविद्यालयाकडे आल्यावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देवून प्रीती झगडेचा सन्मान करण्यात आला. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. एस. भालेराव, प्रा. एस. व्ही. जाधव, महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख प्रा. जी. बी. सानप, महाविद्यालय रिसर्च डेव्हलपमेंट कमिटी प्रमुख डॉ. ऋषिकेश गोळेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळा सहाय्यक कळझुणकर, प्रयोगशाळा परिचर मनोज बोले आदी उपस्थित होते.

Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.