मुंबई विद्यापीठाची निवड; जिल्हातील एकमात्र पुरस्कार विजेता
गुहागर, ता. 03 : राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रत्येक जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या एकमात्र पुरस्कारासाठी गुहागरच्या प्रथमेश परांजपेची निवड झाली आहे. सोमवार, 6 सप्टेंबर 2021 रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कोविड-19 संसर्गजन्य महामारीची परिस्थिती राज्यात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून विविध मदतकार्य करण्यात आले. अशा कार्यांमध्ये उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या स्वयंसेवकाचा गौरव करण्याकरीता राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय एका स्वयंसेवकाची निवड करण्याचे राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष) तर्फे ठरविण्यात आले. त्याकरीता राज्यातील सर्व विद्यापीठांना स्वयंसेवकांनी केलेल्या कामांची दखल घेवून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याचे नाव राज्य शासनाकडे पाठविण्यास सांगण्यात आले होते.

गुहागर शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात शिकणारा प्रथमेश श्रीपाद परांजपे याची निवड जिल्ह्यातील सर्व उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालयांमधून करण्यात आली आहे. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथ पै उच्च महाविद्यालयात शिकणाऱ्या आरती रामु मंजू या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने प्रथमेश परांजपे आणि आरती मंजू या दोन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा रत्नागिरीमधील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सोमवार, दि. 06 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता होणार आहे.

(Guhagar’s Prathamesh Paranjape has been selected for National Service Scheme (NSS) Covid Warrior Award. This Award is given to only One volunteer from each district. The award will be presented by Higher and Technical Education Minister Uday Samant on Monday, September 6, 2021, at Gogate Jogalekar College, Ratnagiri.)
