गुहागर, ता. 9 : आमदार भास्कर जाधव यांनी खेडचे माजी आमदार संजय कदम यांची भेट घेवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे तासभर जाधव कदम यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे. आमदार जाधव खेड येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी गेले होते. MLA Bhaskar Jadhav meet former Khed MLA Sanjay Kadam and wished him a Happy Diwali. Jadhav Kadam had been chatting for about an hour. As a result, political discussions are in full swing. MLA Jadhav had gone to Khed for the inauguration of the ambulance.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव (शिवसेना) आणि खेड – दापोली – मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) या दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळा आमदार संजय कदम गुहागरमध्ये आले होते. संजय कदम हे मुळचे शिवसैनिक आहेत. तसेच खासदार सुनील तटकरे आणि आमदार भास्कर जाधव यांचेही फारसे सख्य नाही. दोघेजण एकमेकांवर थेट टिका करत नसले तरी एकमेकांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. The friendship between Bhaskar Jadhav (Shiv Sena) MLA of Guhagar Assembly constituency and Sanjay Kadam (NCP), former MLA of Khed-Dapoli-Mandangad Assembly constituency is well known. While MLA Bhaskar Jadhav was in NCP, MLA Sanjay Kadam had visited Guhagar many times. Sanjay Kadam is a native Shiv Sainik. Also, MP Sunil Tatkare and MLA Bhaskar Jadhav do not have much in common. Although both do not directly criticize each other, they try to stay away from each other.
महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एका जिल्ह्यातील एका कुटुंबात खासदार, राज्यमंत्री आणि आमदार अशी पदे देण्यात आली आहेत. जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात फिरत नाहीत अशी थेट टिका केली होती.
ऑक्टोबर अखेर झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत दापोलीतील शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला कोकणात धक्का दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मित्र पक्षाच्या गोटातील खंदे शिलेदार फोडले. त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. या भूमिकेचे समर्थन करताना प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे. हे धोरण यापूर्वी ठरले आहे. अशी भूमिका घेतली. पक्ष प्रवेशकर्त्यांपैकी एकाला विधान परिषदेचा शब्द देण्यात आल्याची कुजबूज आहे.
या राजकीय पार्श्र्वभुमीवर आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार संजय कदम यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम, प्रकाश मोरे यांच्यासह पाच सहाजण उपस्थित होते. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे समोर आलेले नाही. मात्र राजकीय पार्श्र्वभुमीचा विचार करता नाराज संजय कदम भविष्यात वेगळा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.