• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आपली प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरा

by Mayuresh Patnakar
November 23, 2022
in Bharat
92 1
0
PM Modi in Rozgar Mela

PM Modi in Rozgar Mela

181
SHARES
518
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंतप्रधान मोदी,  71 हजार तरुणांना दिले नियुक्तीपत्र

नवी दिल्ली, ता. 22 : (PM Modi in Rozgar Mela) केंद्र सरकार देशातील तरुणांना Youth रोजगाराच्या (Employment) संधी (Opportunities) उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. केंद्र सरकारने धनत्रयोदशीच्या दिवशी 75,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. आज पुन्हा 71,000 तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत. या तरुणांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करुन आपली प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरावी. (Use Talent and Energy for Nation) असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. त्यावेळी ते बोलत होते. PM Modi in Rozgar Mela

PM Modi in Rozgar Mela

केंद्र सरकारतर्फे देशातील 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोर्ट ब्लयेर, विशाखापट्टनम, इटानगर, गुवाहाटी, पटना, चंदीगड, रायपुर, नवी दिल्ली, पणजी, गुरुग्राम, सोनीपत, पंचकुला, श्रीनगर, उधमपुर, जम्मु, रांची, हजारीबाग, बेंगलोर, जालंधर, अजमेर, जोधपुर, गंगटोक, चेन्नई, शिवगंगा, हैदराबाद, अगरतळा, लखनौ, पुणे, नागपूर, इम्फाळ, शिलांग, ऐजवाल, दीमापूर, भुवनेश्र्वर, तिरुवनंतपुरम, लेह, भोपाळ, ग्वाल्हेर, प्रयागराज, डेहराडून, कलकत्ता, सिलीगुडी, ग्रेटर नोएडा, या शहरांचा समावेश होता. चेन्नईला अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman), नागपुरला नितीन गडकरी (Nitin Gadkari), प्रयागराजला डॉ. महेंद्रनाथ पांडे (Dr. Mahendranath Pandey), गुरुग्रामला अनुराग ठाकुर (Anurag Thakur) , पुण्यात रामदास आठवले (Ramdas Athavale) असे काही केंद्रीय मंत्री रोजगार मेळाव्यांच्या ठिकाणी उपस्थित होते. PM Modi in Rozgar Mela

PM Modi in Rozgar Mela
PM Modi in Rozgar Mela

Karmayogi Bharat चे उद्‌घाटन

नियुक्ती पत्रे दिल्यानंतर (PM Modi in Rojgar Mela) कर्मयोगी भारत या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्‌घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. हा ऑनलाइन अभ्यासक्रम प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणची आचारसंहिता, नीतिमत्ता, मानव संसाधन धोरणे, भत्ते आणि इतर फायदे आदी विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. कौशल्य विकास व क्षमता विकासासाठी कर्मयोगी भारत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. (Karmayogi Bharat course has been started for skill and capacity development.)

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  तरुण Youth हे देशाची सर्वात मोठी ताकद आहे, त्यांची प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरण्यास केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आज एक महत्त्वाची जबाबदारी अत्यंत विशेष काळात आपण स्विकारत आहात. (PM Modi in Rozgar Mela) स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या संकल्पात, केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून तरुणांनी आपली भूमिका आणि कर्तव्ये सर्वसमावेशकपणे समजून घेतली पाहिजेत.  कर्तव्ये पार पाडण्यासाठी क्षमता वाढवण्यावर सतत भर दिला पाहिजे, आज सुरू झालेल्या कर्मयोगी भारत तंत्रज्ञान मंचाचा फायदा नवीन नियुक्त झालेल्यांनी करावा. असे आवाहनही यावेळी पंतप्रधानांनी केले. PM Modi in Rozgar Mela

Youth are the biggest strength of our country. pic.twitter.com/hb8rl5Nn7X

— PMO India (@PMOIndia) November 22, 2022

The central government is working on a war footing to provide employment opportunities to the youth of the country. Youth is the greatest strength of the Nation, central government is giving top priority to use their talent and energy for nation building. Today you are accepting an important responsibility in a very special time. In the nation’s determination to become a developed nation in the elixir of independence, the youth should comprehensively understand their role and duties as representatives of the central government. Continuous emphasis should be placed on capacity building to perform duties,

Share72SendTweet45
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.