वर्कशॉपला १०० जणांची उपस्थिती
रत्नागिरी, ता. 02 : फोटोग्राफी क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. व्हिडिओग्राफर्सना थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम, बातम्या, युट्युबर, म्युझिक अल्बम, डॉक्युमेंटेशन, व्हॉगर्स अशा विविध प्रकारच्या संधी आहेत. रत्नागिरीमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे आहेत. त्यांना या माध्यमातून प्रसिद्धी देता येईल. या नव्या संधींचे रत्नागिरीतील व्हिडिओग्राफर्सनी सोने करावे, असे आवाहन सोनी कंपनीचे सी प्रो स्पेशालिस्ट सुनील गवई यांनी केले. Photo, Videographers workshop in Ratnagiri
माळनाका येथील सिल्व्हर स्वॅन हॉटेलमध्ये आयोजित फोटोग्राफी वर्कशॉपमध्ये ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर व्यावसायिकांची सहकारी संस्था, कोल्हापूर येथील सुभाष फोटोज आणि सोनी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्कशॉपचे आयोजन केले होते. यापुढेही अशा पद्धतीची अनेक वर्कशॉप रत्नागिरीत आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अजय बाष्टे यांनी या वेळी जाहीर केला. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवर, मार्गदर्शकांचे स्वागत करण्यात आले. Photo, Videographers workshop in Ratnagiri

यावेळी टेक्निकल एक्सपर्ट सुधाकर सिंग यांनी सोनी कंपनीचे मिररलेस कॅमेरे, वेडींग व प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये प्रॅक्टीकलसह कसे वापरायचे यांचे मार्गदर्शन केले. तांत्रिक माहिती दिली. पूर्वी फोटोग्राफी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संशोधनाद्वारे सोनी कंपनीने नवनवीन कॅमेरे बनवले आहेत. २०१३ मध्ये म्हणजे दहा वर्षांपूर्वी पहिला मिररलेस कॅमेरा बाजारात आणला. त्यानंतर सुधारणा करत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित आणि आता तर एआय तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कॅमेऱ्यात केला जात असल्याने फोटोग्राफी अधिक कलात्मक झाली आहे, असे त्यांनी सांगितले. Photo, Videographers workshop in Ratnagiri
सोनी कंपनीचे सी प्रो स्पेशालिस्ट सुनील गवई यांनी सोनी कंपनीचे व्हिडिओ कॅमेरे लाईव्ह व प्रोफेशनलरित्या कसे वापरायचे या बाबतीत मार्गदर्शन केले. या वर्कशॉपसाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूणसह अन्य तालुक्यातील १०० हुन अधिक फोटोग्राफर्स बंधू उपस्थित होते. वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी सोनी इंडियाचे अभिजीत पाबरेकर, सुधाकर सिंग, सुनील गवई, सुभाष फोटोजचे संचालक शंभू ओऊळकर यांच्यासमवेत फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर व्यवसायिकांची सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, साईप्रसाद पिलणकर, नीलेश कोळंबेकर, परेश राजीवले, अमित आंबवकर आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. Photo, Videographers workshop in Ratnagiri
