Latest Post

नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle...

Read moreDetails

MHT-CET /JEE / NEET 2025 प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :-  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष...

Read moreDetails

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

 धीरज वाटेकर, चिपळूण. मो. ९८६०३६०९४८ पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील...

Read moreDetails

 ‘आनंदाचा शिधा’ उद्यापासून मिळणार

गुहागर, ता. 21 :महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत...

Read moreDetails

रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. 21 : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत...

Read moreDetails
Page 1001 of 1707 1 … 1,000 1,001 1,002 … 1,707