• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘ऑफ्रोह’ची सभा व हळदीकुंकू कार्यक्रम

by Manoj Bavdhankar
January 29, 2024
in Ratnagiri
88 1
0
'Ofroh' meeting and Haldikunku program
173
SHARES
495
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कणखर पुरूषांच्या पाठिंब्यामुळेच  स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले; अध्यापिका विस्मया कुलकर्णी

गुहागर, ता. 29 : सावित्रीबाईंनी जरी शिक्षणाची सुरूवात केली तरीही महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं म्हणून ते शक्य झालं. या कणखर पुरूषांच्या पाठिंबा असल्यामुळेच ख-या अर्थाने स्त्री शिक्षणाचे दरवाजे आपल्यापुढे उघडले गेले. आपण इथे आघाडी म्हणून जे  सगळ्याजणी उभ्या आहोत त्या सावित्रीबाईमुळेच आहोत. असे गौरोद्गार काढून ऑफ्रोह संघटनेच्या नावातील ‘ह्युमन’ हा शब्द आवडल्याचे सांगून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीची संधी व अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडणे हेच या संघटनेचं प्रमुख काम आहे, असे उद्गार अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजच्या अध्यापिका विस्मया कुलकर्णी यांनी  काढले. यावेळी ऑफ्रोह रत्नागिरी व  महिला आघाडीची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ‘Ofroh’ meeting and Haldikunku program

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरी व ऑफ्रोह महिला आघाडीची  तिसरी सर्वसाधारण सभा, हळदीकुंकू व प्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी ‘क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांचे जीवनचरित्र व महिला संघटन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व ऑफ्रोहचे कार्याध्यक्ष  राजेश सोनपरोते व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सुपारीचे रोपे देवून करण्यात आले. ‘Ofroh’ meeting and Haldikunku program

यावेळी ऑफ्रोहचे कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, कविवर्य ‘क्षितिज’ कार प्रकाश सावंत, ऑफ्रोहच्या महिला आघाडी उपाध्यक्षा प्रियाताई खापरे, ठाणे महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा विद्याताई पिंजरकर, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके,  पोमेंडी-कारवांची वाडी येथील सरपंच ममता जोशी, ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, कोकण विभागीय सहसचिव गजानन उमरेडकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष  उषाताई पारशे, कार्याध्यक्षा राजकन्या भांडे, ऑफ्रोह रत्नागिरीच्या उपाध्यक्ष नंदा राणे  इत्यादि मान्यवर उपस्थित होते. ‘Ofroh’ meeting and Haldikunku program

ऑफ्रोह रत्नागिरीचे सचिव बापुराव रोडे मागील वर्षाच्या इतिवृत्ताचे वाचन व जमा-खर्च अहवाल व सन 2024-25 चे अंदाजपत्रक सादर केले. ऑफ्रोहच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा व दुस-या सत्रातील हळदीकुंकू व प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या व अध्यक्षा प्रियाताई खापरे  यांनी रत्नागिरी हे माझं संघटनात्मक माहेर असल्याचे भावनिक  गौरोद्गार काढले. यावेळी   कविवर्य प्रकाश सावंत, सरपंच वैष्णवी नेटके, सरपंच ममता जोशी, गजेंद्र पौनीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी उपस्थित महिला भगिंनी हळदीकुंकू व वाण वितरीत करण्यात आले. किशोर रोडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन  महिला  आघाडीच्या सचिव सुनंदा देशमुख यांनी केले. यावेळी ऑफ्रोहचे जिल्ह्यातील कर्मचारी सभासद उपस्थित होते. ‘Ofroh’ meeting and Haldikunku program

Tags: 'Ofroh' meeting and Haldikunku program
Share69SendTweet43
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.