पदवीधर विद्यार्थ्यांची समस्या, साहिल आरेकर यांनी वेधले लक्ष
गुहागर, ता. 18 : वाणिज्य शाखेतील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागून १ वर्षं पूर्ण झाले. तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, अंतिम वर्षांत उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. या संदर्भातील माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे.
In Octobet 2020 Final Year Result was announced By Mumbai University, But after 9 month since result, The Commerce Studend have not received Marklist and Degree Certificate. Thus the student facing problemes in employment and admission for other courses. In this regard District President of NCP Students Congress Sahil Arekar write a letter to Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant.
मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. वरिष्ठ महाविद्यालयातील काही विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या तर काही विषयांच्या परीक्षा होणे बाकी होते. या सर्व परीक्षा कोरोनाची पहीली लाट ओसल्यावर ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. किंवा आधीच्या वर्गातील गुण, सदर विद्यार्थ्यांने त्या वर्षात पुर्ण केलेल्या असाईनमेन्ट यावर आधारीत सरासरी गुणांवर निकाल जाहीर करण्यात आले. अशाच पध्दतीने मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यांचे निकाल ऑक्टोबर 2020 मध्ये जाहीर झाले. मात्र अद्याप या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, उत्तीण विद्यार्थ्यांना मिळणारे पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करताना, नोकरी करणाऱ्या संस्थेतून होणारी गुणपत्रिकेची मागणी, अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात गुहागरमधील काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांची भेट घेवून ही समस्या सांगितली. काही महाविद्यालयांशी चर्चा करुन या समस्येची खातरजमा केली. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देवून या विषयात लक्ष घालून विद्यार्थी वर्गाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.