• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात शिशूंना नवदृष्टी

by Guhagar News
July 19, 2023
in Old News
79 1
0
New vision for newborns in district government hospital
155
SHARES
444
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.19 : नवजात शिशूंच्या चाचण्या वेळेवर झाल्या तर त्यांच्यातील कायमचे अंधत्व दूर होऊ शकते. अशाच तीन नवजात बालकांना येथील रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायमस्वरूपी अंधत्व टळले आहे. यात मध्य प्रदेशातील कामगाराच्या बालकाचा व रत्नागिरीतील दोन बालकांचा समावेश आहे. New vision for newborns in district government hospital

रत्नागिरीतील दोन महिलांची जिल्हा शासकीय रुग्णालयात व मध्यप्रदेशातून कामानिमित्त दापोलीत असलेल्या एका कामगाराच्या पत्नीची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली. या मुलांचे दोन किलोंपेक्षा कमी वजन असल्याने या बाळांच्या रुग्णालयाच्या ‘डीईआयसी’ कार्यक्रमाअंतर्गत कानासाठी ‘OAE’ आणि दृष्टीसाठी ‘ROP’ या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी या बालकांमध्ये तीव्र दृष्टिदोष आढळला. या बालकांना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू काळजी कक्षात (एसएनसीयू) ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके) आणि ‘डीआयई’ कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला. New vision for newborns in district government hospital

या बाळांच्या डोळ्यांवर आवश्यक ती शस्त्रक्रिया करणे अवघड आणि आव्हानात्मक होते. त्यासाठी आवश्यक असलेले ११ हजार रुपयांचे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून हे इंजेक्शन मोफत उपलब्ध झाले. ‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’ या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छछडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. त्यामुळे या बालकांना कायमस्वरूपी अंधत्वापासून वाचविणे शक्य झाले. या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी या मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. New vision for newborns in district government hospital

या बाळांसाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सूर्यगंध, एसएनसीयू इन्चार्ज़ सुवर्णा कदम, तसेच जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण टीम यांना या मातांनी धन्यवाद दिले. New vision for newborns in district government hospital

Share62SendTweet39
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.