• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगरपंचायतच हवी असगोलीत कुजबुज

by Mayuresh Patnakar
September 3, 2021
in Old News
17 0
0
नगरपंचायतच हवी असगोलीत कुजबुज

गुहागर : 2017 मध्ये असगोली ग्रामपंचायत झाल्यावर अशी मिरवणूक काढण्यात आली होती.

33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विकासप्रश्र्नांबाबत कुचंबणा होत असल्याने नाराजी

गुहागर, ता. 03 : गुहागर नगरपंचायतीमधुन बाहेर पडून ग्रामपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या असगोलीमध्ये सध्या नगरपंचायतीत होता ते बरे होते अशी कुजबुज सुरु आहे. याची जाहीरपणे वाच्यता कोणीच करत नाही. मात्र लसीकरण, पाणी प्रश्र्न, पथदिप आदी पायाभुत सुविधांसाठी कायमच संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी आहे.

2012 मध्ये गुहागर नगरपंचायतीची स्थापना झाली तेव्हा असगोली गावाचा नगरपंचायतीमध्ये समावेश होता.  मात्र असगोली ग्रामस्थांनी नगरपंचायतीमधील समावेशाला कडाडून विरोध केला. राज्य सरकार विरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजप असगोलीवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर मे 2017 मध्ये असगोलीला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला. गावाने आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली.

आज साडेचार वर्षांनी याच असगोलीमध्ये ग्रामपंचायत नको नगरपंचायत बरी होती. ही भावना बळावू लागली आहे. असगोली ग्रामपंचायत झाली. पण त्याआधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्याने ग्रामपंचायतीचे प्रश्र्न धसास लावणारा हक्काचा लोकप्रतिनिधी असगोलीवासीयांकडे नाही. परिणामी गावाचा विकास थांबला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे नियोजन झाले. पण जिल्हा परिषदेच्या आराखड्यात असगोलीचे नावच नव्हते. गुहागर नगरपंचायतीने आपल्याकडील लसीकरणात असगोलीवासीयांना समाविष्ट केले नाही. अखेर गावातील कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कोट्यातून लस देण्यात आली.  
मनिषा कन्स्ट्रक्शनने रस्त्याचे काम करताना दोन वेळा असगोली ग्रामपंचायतीची जलवाहीनी तोडली. त्यामुळे ऐन मे महिन्यात पाणी टंचाईची वेळ असगोली गावावर आली. हा प्रश्र्न सोडवण्याकडे मनिषा कन्स्ट्रक्शनने दुर्लक्ष केले.
कोरोना संकटापासून ग्रामसभा झालेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या सभा होत नाही. अशावेळी ग्रामसेवकाने पुढाकार घेवून गावातील समस्या सोडविण्यासाठी निधी आणण्याची आवश्यकता होती. परंतू ग्रामसेवकाने गावाच्या विकासात लक्ष घातलेले नाही. त्याच्यांकडे पालशेत ही मोठी ग्रामपंचायत असल्याने असगोली ग्रामपंचायतीचा अनिवार्य प्रशासकीय कारभार केवळ ते पहात आहेत.
2017 मध्ये ग्रामपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस नगरपंचायतीकडून रेकॉर्ड आणण्यात गेले. त्यानंतर प्रशासकीय कामकाजाला सुरवात झाली. परंतु विकासाच्या कामांना गतीच मिळालेली नाही. आजही अपुरा पाणी पुरवठा, पथदिप नाहीत,  पुरेशी लस मिळत नाही. अशा अनेक समस्या असगोलीवासीयांना भेडसावत आहे. या सर्व समस्यांमुळे असगोलीवासीयांमध्ये प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. म्हणूनच ग्रामपंचायत नको नगरपंचायत बरी होती हा विचार असगोलीत चर्चिला जात आहे.
(Asgoli, which was transformed into a Grampanchayat after leaving Guhagar Nagar Panchayat, is now wants to disolve in the Nagar Panchayat Again. Obviously no one makes it legible. The people of Asgoli do not have Panchayat Samiti Representative, Zilha Parishad Representative to solve the problem of Villeges from Government. As a result, the development of the village has stopped. However, the villagers are dissatisfied with the Government as they have to fight for basic facilities like vaccination, water supply, street lighting etc. Hence the villegers thinking as Nagar Panchayat is better than Gram Panchayat.)

Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.