विक्रांत जाधव, आरोग्य केंद्रांना मिळणार नव्या रुग्णवाहिका
गुहागर, ता. 07 : माझी रत्नागिरी अभियानामुळे जिल्ह्यातील ग्राम कृती दले सक्रीय झाली आहेत. जिल्ह्यातील लसीकरणही वेगाने सुरु आहे. यासर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होईल. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळतील. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी वाहनांची अडचण भासणार नाही. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले. ते गुहागरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Due to My Ratnagiri Program Gram Kruti Da’s have been activated in the district. Vaccination in the district is also in full swing. The combined effect of all this activities will be reduce the impact of corona in Ratnagiri District Said Zilha Parishad President in Press Conference..
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शुक्रवारी गुहागरला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रांत जाधव म्हणाले की, आरोग्य विभागाला कोरोना महामारीत रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. हे लक्षात घेवून पालकमंत्र्यांकडे दोन महिन्यांपूर्वी मी स्वत: जिल्ह्यासाठी 67 रुग्णवाहिकांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी 46 रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 9, दुसऱ्या टप्प्यात 7 रुग्णवाहिका आणि तिसऱ्या टप्प्यात 30 रुग्णवाहिका मिळतील. पहिल्या टप्यातील 9 रुग्णवाहिकांपैकी प्रत्येकी 2 रुग्णवाहिका हेदवी व तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळतील. दुसऱ्या टप्प्यात आबलोली केंद्राला रुग्णवाहिका मिळेल.
जिल्ह्यामध्ये लसीकरण वेगाने सुरु आहे. सुरवातीला जिल्ह्यात 10 ते 12 टक्के लस नागरिक न आल्याने फुकट गेली होती. मात्र आता उपलब्ध लसींचे नियोजन होत असल्याने लस फुकट जात नाही. ही महत्त्वाची बाब आहे. गुहागर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ४५ वरील नागरिकांची नोंदणी करावी. उपलब्ध लसीनुसार स्वयंसेवकांकरवी त्यांना निरोप पाठवून लसीकरण करावे. म्हणजे गर्दी होणार नाही. अशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे. 45 + साठी आवश्यक असणारी लस गुहागर तालुक्याला देण्यासाठी प्रयत्न करेन असेही त्यांनी सांगितले.
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अभियानामुळे ग्राम कृती दले सक्रीय झाली आहेत. काही ठिकाणी कोराना संशयित रुग्णही सापडत आहेत. जिल्ह्यात हे अभियान ग्रामपंचायत, ग्राम कृती दल, आरोग्य, महसुल या सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे पार पाडीत आहेत. गुहागर तालुक्यातील अनेक गावात हे अभियान अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी होवू. असा विश्र्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुहागर तालुक्याचा मृत्यूदर सर्वात कमी
गुहागर तालुक्याचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वात कमी आहे. उपलब्ध सुविधांमध्येही कोरोना रुग्णांवर योग्य पध्दतीने उपचार केल्यानेच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल तालुक्यातील प्रशासनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी अभिनंदन केले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यात आज काय घडले ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टँकर नाही म्हणून पाणीच पुरवणार नाही का
जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागर केले लसीकरण
आरजीपीपीएलला कोविड सेंटर करावेच लागणार
माझी रत्नागिरी अभियानामुळे प्रादुर्भाव कमी होईल