परशुराम अभियांत्रिकीचा ऑनलाइन वार्षिकोत्सव
दिनेश खेडेकर
गुहागर, ता. 25 : तंत्रज्ञानाचा सुलभ वापर करणाऱ्यावर भर देणाऱ्या गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरने या वर्षी ‘सप्तक २०२१’ या वार्षिकोत्सवाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन केले होते. त्यासाठी गुगल मीट, गूगल फॉर्म, झूम मीट, व्हॉट्सॲप, डिस्कॉर्ड या ॲपलिकेशनचा वापर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाइन वार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. सप्तक 2021 मधील कार्यक्रम सात दिवस सुरु होते.
कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आदीमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिकण्यात गेले. वर्गातील अभ्यासापासून प्रयोगशाळेत करायचे प्रयोग देखील व्हर्च्युअल लॅबद्वारे झाले. मग शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या वार्षिकोत्सव का रद्द करायचा. अशा विचारातून अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सप्तक 2021 चे ऑनलाइन पध्दतीने आयोजन केले. ऑनलाइन वार्षिकोत्सवातील कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा पूर्वा मोरे, सेक्रेटरी सुबोध जांगळी, सहकारी निखिल साखरकर, अर्णव चव्हाण, श्रेया पालांडे, स्वप्निल जोयशी, दर्शन पाष्टे, पार्थ धामणस्कर, सफवान वाडकर, स्वप्निल चव्हाण, गौरव कटारे, विवेक माळी, निशांत गांधी या सर्वांनी मेहनत घेतील. सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे कार्यक्रम कोणते असावेत, ऑनलाइन पध्दतीने स्पर्धात्मक खेळ कसे खेळता येतील. सांघिक स्पर्धा कशा घ्यायच्या. कोणत्या गोष्टींचे ऑफलाईन व्हिडिओ बनवून चालतील. ते एकत्रित दाखविण्याची व्यवस्था कशी करायची. कोणत्या ॲपवर कोणते कार्यक्रम घ्यायचे. या सर्वांचे नियोजन करुन कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम याचे वेळापत्रकही विद्यार्थ्यांनीच बनविले. संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनापर्यंत पोचविण्यात आले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक प्रा.प्रिती साठे, विद्यार्थी परिषदचे समन्वयक प्रा. रोहन गोंधळेकर, क्रीडा विभाग समन्वयक प्रा. विशाल पाटील, एन.एस.एस विभाग समन्वयक प्रा. गजानन खापरे या शिक्षकांनी नियोजनात त्रुटी नाहीत ना याकडे लक्ष दिले.
गायन, नृत्य, कविता वाचन, अभिनय, स्केचिंग, वादविवाद स्पर्धा, चेस पझल, कॅरम, लुडो, मिस व मिस्टर फोटोजेनिक, व्हर्च्युअल ट्रेझर हंट, निसर्ग छायाचित्र, व्हिडीओ लघुफीत असे कार्यक्रम सप्तक 2021 मध्ये घेण्यात आले.
मिस व मिस्टर फोटोजेनिक या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी कोणत्याही पोझ मधील एक फोटो नियोजन समितीकडे पाठवायचा होता. नियोजन समितीने तो फोटो कॉलेजच्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड केला व त्यांची लिंक स्पर्धकांना दिली होती. त्यांनी ती लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवायची. सर्वाधिक लाईक्स असणारा फोटो विजेता ठरला.
रॅम्प वॉकला पर्याय म्हणून रॅम्पफोलिक अशी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये स्पर्धकांनी आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात योग्य जागा निवडून त्या जागेला साजेसे रॅम्पवॉक करायचे. आपला परिचय द्यायचा. त्याचा व्हिडिओ सप्तक 2021 च्या माहिती स्थळावर पाठवायचा. कमी वेळात, आजुबाजुच्या वातावरणाला योग्य परिचय देणारा, रॅम्पवॉक करणाऱ्याला परीक्षकांनी विजेते ठरविले.
डिस्कॉर्ट ॲपवर व्हर्च्युअल ट्रेझर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये घरातील वस्तूंशी निगडीत असा प्रश्र्न एका टीमने विचारायचा. अन्य टीमनी ती वस्तु ओळखून त्याचे उत्तर एका शब्दात बोलून (व्हॉईस), लिहून किंवा त्या वस्तूचा फोटो टाकून द्यायचे. प्रत्येक टिमला प्रश्र्न विचारण्याची संधी होती. कमीत कमी वेळात, सर्वाधिक प्रश्र्नांची उत्तरे देणारी टीम विजेती.
बुद्धीबळ ऑनलाईन खेळण्यासाठी इंटरनेटची चांगली व्यवस्था लागते. त्याला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी काही कोडी तयार केली होती. उदाहणार्थ शब्दांमध्ये बी७वर राजा, सी८ वर वजीर आणि ६ एवर हत्ती आहे तर तीन मुव्हमध्ये चेकमेट कशी कराल असे कोडे. ती व्हॉटसॲप चॅटवर अपलोड केल्यावर त्याचे योग्य, कमी चालींमधील उत्तर (ऑप्टीमम सोल्यूशन) कमीत कमी वेळात देणारा विजेता.
प्रश्र्नमंजुषा ही स्पर्धा देखील ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आली. या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांसाठी गुगल फॉर्मचा वापर करण्यात आला. तर अंतिम फेरी डिस्कार्ट ॲपवर घेण्यात आली.
सप्तक 2021 मधील या स्पर्धांमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसेही ऑनलाइन पध्दतीने देण्यात आली. सदर वार्षिकोत्सव कार्यक्रम विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे चेअरमन डॉ.विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar in Guhagar taluka, which emphasizes easy use of technology, organized the annual festival ‘Saptak 2021’ online this year. For this, Google Meet, Google Form, Zoom Meet, WhatsApp, Discord applications were used. Cultural Department Coordinator Prof. Preeti Sathe, Student Council Coordinator Prof. Rohan Gondhalekar, Sports Department Coordinator Prof. Vishal Patil, NSS Department Coordinator Prof. Gajanan Khapre, Student Council President Purva More, Secretary Subodh Jangli, Co-workers Nikhil Sakharkar, Arnav Chavan, Shreya Palande, Swapnil Joyashi, Darshan Pashte, Partha Dhamanaskar, Safwan Wadkar, Swapnil Chavan, Gaurav Katare, Vivek Mali, Nishant Gandhi everyone will work hard to plan the events for the online anniversary. What should be the programs of the cultural department, how competitive games can be played online. What things will make an offline video. How to arrange to show it together. Which program to take on which app. All of this was scheduled. His information was disseminated to all the students. Google Form was used to participate in the contest.