गुहागर, दि.12 : येथील तहसिल कार्यालयात महाराजस्व अभियान पार पडले. या अभियानाला जिल्हाधिकारी डॅा. बी एन. पाटील, तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे व प्रांत अधिकारी प्रविण पवार उपस्थित होते. यावेळी गुहागर तालुक्यातील अपंग, विधवा लाभार्थ्यांसाठी मंजुरी प्रमाणपत्र, दाखले वाटप व कुटुंब लाभार्थ्यांसाठी धनादेश वाटप करण्यात आले. एकूण 14 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

जिल्हाधिकारी डॅा. बी एन. पाटील यांच्या हस्ते श्रीम. मिना लावमा घाणेकर रा. पाचेरीसडा, श्री. वासूदेव जानू डिंगणकर रा. पाचेरीसडा, यांना संजय गांधी अपंग निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

श्रीम. वंदना गोबिंद आंबेकर रा. शिर, श्रीम. राधिका कृष्णा पांचाळ रा. आबलोली, यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

श्रीम. रूपाली दिपक फडतरे रा. गुहागर, श्रीम. हर्षदा एकनाथ पानवलकर रा. वरवेली, श्रीम. सुरवंता सुदर्शना शिरगावकर रा. धोपावे, श्रीम. सरिता सदानंद महाडिक रा. वेलदूर यांना संजय गांधी विधवा निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

इतिक्षा सुरेंद्र जांभारकर -वय अधिवास, महेंद्र दत्ताराम भोसले- नाँनक्रिमिलेयर, शंकर गोविंद गिजे -उत्पन्न दाखला हे दाखले वाटप करण्यात आले. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

तसेच मंडळ अधिकारी पाटपन्हाळे यांचे फेरफार अदालतीत श्रीम. मनिषा शिवराम राऊत यांना तलाठी सजा चिखली – वारस तपास मंजूर व श्री. अविनाश विनायक शिर्के यांना तलाठी सजा मुंढर -हक्कसोडपत्र मंजूर करण्यात आले. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी अंतर्गत श्रीम. प्रणाली प्रदीप पवार रा. आबलोली यांस मंजूर झालेला धनादेश रू. 20000/- वाटप करण्यात आला. Maharajaswa Abhiyan in Guhagar Tehsil

