गुहागर, ता. 09 : श्री देव कोपरी नारायण देवस्थानतर्फे अधिक मासात कुमारिका पूजनाचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी 13 ऑगस्टला, दुपारी 3 ते 5 या वेळेत कोपरी नारायण मंदिरात 30+3 कुमारिकांचे पूजन होणार आहे. Kumarika Pujan at Kopari Narayan Temple
आज स्त्रीवर होणाऱ्या अन्यायांच्या अनेक घटना समोर येतात. या घटना समाज व्यवस्थाच थांबवू शकते. त्यासाठी समाजात स्त्री म्हणजे आदीशक्ती, मातृशक्ती हा विचार रुजण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा विचार रुजविण्यासाठी नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा विविध कार्यक्रमांची व्यवस्था आहे. त्यापैकी एक व्यवस्था म्हणजे कुमारिका पूजन. श्री कोपरी नारायण देवस्थानद्वारे अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासात सर्व समाजातील कुमारिकांचे विधीवत पूजन केले जाते. कुमारिकांचे पूजन करण्यासाठी शहरातील विविध श्रेणीतील दांपत्याना निमंत्रित केले जाते. पूजनासाठी आवश्यक सर्व साहित्याची व्यवस्था देवस्थान करते. सर्व कुमारिकांना रुमाल (वस्त्र), गजरा व टिकल्या यासह पेन, पेन्सील, रंगीत खडू, आदी साहित्याचा संच व एखादे छोटे पुस्तक भेट म्हणून दिले जाते. Kumarika Pujan at Kopari Narayan Temple

यावर्षी दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते सायं. 5 या वेळेत श्री देव कोपरी नारायण मंदिर, वरचापाट येथे कुमारिका पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर गुहागर शहरातील 333 मुलींना कुमारिका पूजनाच्या निमित्ताने छोटीशी भेट (दान) देण्याचा संकल्प देवस्थानने केला आहे. अधिक मासामध्ये दान केल्यास अधिक पुण्य मिळते. त्यात श्रावण महिना म्हणजे उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. आज तब्बल 19 वर्षांनंतर श्रावण महिना अधिक आला आहे. तरी स्त्री सन्मानाचा विचार पोचविण्याऱ्या दानयज्ञात धनरुपी समर्पण करावे. अधिक माहितीसाठी समीर घाणेकर व अद्वैत जोशी यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन देवस्थानचे विश्र्वस्त मनीष खरे यांनी केले आहे. Kumarika Pujan at Kopari Narayan Temple
