गुहागरच्या सुपुत्रचा आणखी एक सन्मान

प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर याला कृषिरत्न पुरस्कार

गुहागर, ता. 26 :   मराठी वृत्तवाहिनितील अग्रगण्य असलेल्या न्युज एटीन लोकमत वृत्त वहिनीकडून कोकणातील प्रयोगशील शेतकरी आणि SK4 चे प्रणेते सचिन कारेकर यांना यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे हा सन्मान सोहळा संपन्न झाला. Krishi Ratna Award to Sachin Karekar

शेती विषयात उल्लेखनीय कामगिरी बद्दल सचिन कारेकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. याआधी देशाच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्म यांच्या हस्ते श्री. कारेकर यांचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला होता. SK4 या हळद वाणाच्या संशोधनाबद्दल गुहागर मधील आबलोली गावातले प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचे कौतुक सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Krishi Ratna Award to Sachin Karekar