आम्ही कोकणकर संघटनेतर्फे आयोजन
गुहागर, ता. 13 : कोकण म्हणजे नक्की काय? स्वर्ग कुठे आहे हे माहीत करायचे असेल तर त्याने कोकणात जावे. कारण कोकण हा जणु स्वर्गच आहे. कोकणात जन्माला आलेला प्रत्येक माणुस हा स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण कोकण निसर्ग आहेच तसं; कोकण आठवण की नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि पसरलेला समुद्र. कोकणच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालत असुन पावसाळ्यात जर घाट रस्ता बघितला तर त्या वेळेस दिसलेलं कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल. Konkan Gaurav ceremony in Virar
नुकताच या मोसमाचे औचित्य साधत रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी भाऊ साठे वर्तक हाॅल (विरार) येथे आम्ही कोकणकर संघटनेचा १० वर्धापन दिन व कलाकार गुणगौरव सोहळा साजरा झाला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, सेक्रेटरी युवराज संतोष, उपाध्यक्ष अमेय खापरे, दिपक मांडवकर (पत्रकार), शैलेश कावणकर, डॉ. दिपक हुमणे, दिलीप डिंगणकर, सुनिल भुवड, शाहीर प्रकाश पांजणे, मंगेश येद्रे, राजेश येद्रे,, संदेश येद्रे, अमोल भाताडे, दिग्दर्शक सुभाष गोताड, नरेश मोरे (पत्रकार), सिद्धी सांडे, अभिनेत्री तक्षियी, मी कोकणी निखिल, प्रथमेश पवार, पोस्टर बॉय चेतन, अमित काताळे, सचिन कुलये, गिरीश रामगडे, मंगेश पारदले, अनेक मान्यवर मंडळी, युट्यूबर , लेखक, निर्माते, गायक, शाहिर, अनेक Reels Star, कवी आणि रसिक वर्ग या सोहळ्याला उपस्थित होते. कारण हा सन्मान पुर्वजांच्या पुण्याईचा आपल्या लोककलेचा होता. Konkan Gaurav ceremony in Virar
आपण १० वर्ष घेतलेली मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास म्हणावं लागेल. आम्ही कोकणकर कलामंचान नमन, नाटक असे अनेक प्रयोग सादरीकरण केले. व आपली वेगळीच ओळख निर्माण केली. या संघटनेने सलग १० वर्ष मेहनत घेऊन कोकणची लोककला जोपासण्याचा पर्यंत केला. अनेक कलावंतांनी, कलाकारांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन व ज्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली. आपली कला लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कलामंचाच नाव रोशन करण्यासाठी हातभार लावला त्याबद्दल शाल, सन्मानचिन्ह सहित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. यामध्ये 90 कलाकारांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. Konkan Gaurav ceremony in Virar
अनेक मान्यवर व रसिक वर्गाच्या उपस्थित कौटुंबिक व सामाजिक विषयाला गवसणी घालणारी कोकणच्या वैभवशाली भुमीतील कोकणी माणसाच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी दोन अंकी कोकणचा पोरं नाटक बॅनरचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात काही कलाकारांनी कविता सादर केली तर काहींनी डान्स तर कोकणचा बादशहा अथार्त सुमधुर आवाजाचे शाहीर प्रकाश पाजणे बुवा यांनी आम्ही कोकणकर कलामंच बद्दल गीत सादर केलं. सध्या युट्युब ला धुमाकूळ घालणारे मी कोकणी निखिल व आपला अमोल सोबत किशोर यांची कॉमेडी मैफिल रसिक चाहत्यांना पाहावयास मिळाली. कुणबी समाज मुंबई व स्वराज्य कोकण कलामंच (मुंबई) यांच्या वतीने आम्ही कोकणकर कलामंचाचे संस्थापक/लेखक कृष्णा येदें यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तरी हा स्वप्नपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. Konkan Gaurav ceremony in Virar