Guhagar News : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. 1838 साली मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रकाशित केल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. Journalist’s Day Special
‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. Journalist’s Day Special
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. पण, सजाम सुधारण्यासाठी ही एक आयती संधी त्यांना मिळाली होती. वृत्तपत्रात समाजाविरोधात भाष्य करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. पण, दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली. तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. Journalist’s Day Special
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची बुद्धिमत्ता अष्टपैलू होती. त्यांचे संस्कृत, मराठी, गुजराती, लॅटिन आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. गणित व ज्योतीष या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. म्हणूनच ‘दर्पण’चा अंक परिपूर्ण असे. त्या काळात या अंकाचे तीनशे वर्गणीदार होते. जवळपास साडेआठ वर्षे ‘दर्पण’चा अंक निघाला. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक निघाला आणि ‘दर्पण’ चा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी 1840 साली सुरू केले. ‘दिग्दर्शन’मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास याविषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Journalist’s Day Special