• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चोरट्या वाळूसाठी हेदवीचा खारभूमी बंधारा तोडला

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Guhagar
170 2
0
Illegal sand extraction in Velaneshwar

हेदवी येथील तोडलेला खारभूमी बंधारा

335
SHARES
956
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वरमध्ये जेसीबीने अवैध वाळू उपसा; प्रशासन सुस्त

गुहागर, ता. 20 :  हेदवी समुद्र किनारी शासनाचा लाखो रुपये खर्च करून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी खारभूमी बंधारा तोडण्याचा प्रताप केल्याचे समोर आले आहे. हा बांधलेल्या बंधारा तोडल्यामुळे समुद्राचे खारे पाणी उधाणाच्या वेळी थेट बागायतीमध्ये जाऊन फळबागे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. येथील अनेक बागायतदारांनी याविरोधात लेखी तक्रार करूनही स्थानिक प्रशासन व महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील वेळणेश्वर किनारी थेट जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. Illegal sand extraction in Velaneshwar

गुहागर तालुक्यात अवैध हातभट्टी व्यवसाय, अवैध वाहतूक आणि अवैध चोरट्या वाळू व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. हेदवी भंडारवाडा येथे जमीनीची धूप होऊ नये, समुद्राच्या खाऱ्या पाण्याने फळबागा उध्दस्त होऊ नयेत व लोकवस्तीचे संरक्षण व्हावे, म्हणून शासनाच्या खारभूमी योजनेतून लाखो रुपये खर्च करून हेदवी समुद्र किनारी खारभूमी बंधारा बांधण्यात आले आहेत.  परंतु येथील वाळू व्यावसायिकांनी अवैधपणे समुद्राच्या पांढऱ्या वाळूची चोरटी तस्करी करण्यासाठी थेट बंधारा तोडण्याचा प्रताप केल्याचे समोर आले आहे. याठिकाणी चोरटी वाळू उपसा व व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या अवैध वाळू व्यवसायिकांच्या विरोधात आवाज उठवल्यास तक्रारदारांना धमकावले जाते. म्हणून या वाळू व्यावसायिकांविरोधात कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. Illegal sand extraction in Velaneshwar

गुहागर तालुक्यात गेले अनेक वर्ष परचुरी, कारुळ, भातगाव, पालशेत, नरवण पंधरवणे, हेदवी, वेळणेश्वर, गुहागर बाग या ठिकाणी वाळूचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. परंतु, कारुळ, परचुरी, भातगाव या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी या अवैध व्यवसायाला विरोध दर्शविल्याने याठिकाणी अवैध वाळू व्यवसाय बंद आहे. परंतु वेळणेश्वर येथे थेट जेसीबीच्या माध्यमातून वाळू उपसा केला जात आहे. तर हेदवीमध्ये थेट खारभूमीचा बंधारा तोडून रस्ता तयार केला आहे. याठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री १० वा. पर्यंत वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. Illegal sand extraction in Velaneshwar

नेहमीच तत्परतेने काम करणारे तालुक्यातील महसूल विभाग या अवैध वाळू व्यावसायिकांवर कारवाई करणार आहे का? की या ठिकाणी तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी वेळकाढू भूमिका घेणार आहे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे. Illegal sand extraction in Velaneshwar

Tags: Illegal sand extraction in Velaneshwar
Share134SendTweet84
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.