• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर मनसे तर्फे डॉ. सुवर्णा पाटील यांचा सन्मान

by Ganesh Dhanawade
July 31, 2023
in Health
149 2
0
Honored by Guhagar MNS to Dr. Suvarna Patil
293
SHARES
837
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने वालावलकर रुग्णालय, डेरवणच्या मेडीकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा नेताजी पाटील यांना मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील असणारे उल्लेखनीय योगदान आणि भावी पिढीस प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीमत्वाचा यावेळी गौरव करण्यात आला. Honored by Guhagar MNS to Dr. Suvarna Patil

हा सत्कार कार्यक्रम डेरवण येथील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी डॉ. सुवर्णा पाटील यांनी रुग्णालयातील वैद्यकीय कामकाजाची माहीती दिली. तसेच रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, उपकरणांची माहीती देवून या रुग्णालयातील नवनवीन साधनांचा उपयोग रुग्णांना होईल तसेच रुग्णावर आम्ही त्वरीत उपचार करत असतो, तरीही सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. रुग्णालयाचे सोशल वर्कर सचिन धुमाळ यांनी संपूर्ण रुग्णालयातील प्रत्येक विभागाच्या ठिकाणी नेऊन अत्याधुनिक उपकरणांची माहीती दिली.  Honored by Guhagar MNS to Dr. Suvarna Patil

यावेळी रुग्णालयातील डॉ. आसावरी मोडक यांनी चित्रफितीच्या माध्यमातून रुग्णालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यतचा रुग्णालयाचा प्रवास उलगडला. तसेच रुग्णालयाच्या वतीने होणारी विविध आरोग्य शिबीरे व अत्याधुनिक साधनांची माहीती दिली. संस्थेच्या वतीने राबवित असलेले व्यवसायाभिमुख, तंत्रशिक्षण, आरोग्य, करिअर, नर्सिंग, महिलांसाठी असणारे लघुउद्योग आदीची माहिती दिली. रुग्णालयाच्या वतीने लहान मुले, स्तनदा माता, गरोदर माता यांची विविध आरोग्य तपासणी व इतर वैद्यकीय उपचाराबाबत माहीती दिली. Honored by Guhagar MNS to Dr. Suvarna Patil

यावेळी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, चिपळूण उपतालुकाध्यक्ष उदय घाग, विभाग अध्यक्ष रविंद्र घाग, विभाग अध्यक्ष सुरेश घाग, उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर, उपविभाग अध्यक्ष महेश सुतार, शाखा अध्यक्ष दहिवली विश्वनाथ खाडे, गुहागर तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष सागर शिरगावकर, जितेंद्र साळवी आदी उपस्थित होते. Honored by Guhagar MNS to Dr. Suvarna Patil

Share117SendTweet73
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.