• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात मुसळधार

by Mayuresh Patnakar
June 16, 2021
in Old News
16 0
0
गुहागर तालुक्यात मुसळधार
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेत बाजारपुलावरुन पाणी, शहरातील काही घरांपर्यंत पाणी

गुहागर, ता. 16 :  मंगळवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. बुधवारी सकाळपर्यंत पडणाऱ्या पावसाने अनेकांची झोप उडवली. पालशेत येथील बाजारपुल पाण्याखाली गेला. गुहागर शहरातील अनेक घरांपर्यंत पाणी पोचले. सुदैवाने बुधवारी सकाळी पावसाने तीन तास घेतलेल्या विश्रांतीमुळे पाणी ओसरले.
Heavy rains started in the Guhagar taluka from Tuesday night. The market bridge at Palshet went under water. Water reached many houses in Guhagar city. Luckily the water receded on Wednesday morning after a three-hour break from the rain. As per the records taken on Wednesday morning, 130 mm of rain was recorded in Guhagar Circle, 106 mm in Patpanhale and Hedvi Circle, 100 mm in Abloli Circle and 105 mm in Talwali Circle. This is the highest rainfall recorded this monsoon season.
मंगळवारी (ता. 17) रात्री गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली.  पालशेत येथील बाजारपुल पहाटे 4 च्या दरम्यान पाण्याखाली गेला. बुधवारी वाजेपर्यंत पाण्याचा वेग प्रचंड असल्याने वहातूकीचा खोळंबा झाला होता. पावसाचा जोर इतका होता की, पुलावरुन जाणारे पाणी पालशेतच्या बाजारपेठेपर्यंत घुसले. मच्छीमार्केट परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी घुसण्याची भिती निर्माण झाली होती.
गुहागर शहरातील साखवी परिसरातील गोयथळे व खरे यांच्या घरापर्यंत पाणी पोचले. खालचापाट परिसरातही काही घरांच्या अंगणापर्यंत नाल्याचे पाणी पोचले होते. सुदैवाने बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे लगेचच पाण्याचा निचरा झाला. आबलोली येथील एका गोठ्याचे नुकसान झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीप्रमाणे गुहागर मंडलात 130 मिलिमिटर, पाटपन्हाळे  व हेदवी मंडलात 106 मिलीमिटर, आबलोली मंडलात 100 तर तळवली मंडलात 105 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळाच्या या हंगामातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. बुधवारी सकाळी दोन तास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाची संततधार सुरु झाली आहे. असाच पाऊस सुरु राहीला तर पुन्हा पालशेतचा बाजारपुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

पालशेत आणि गुहागरमधील पावसाचा व्हिडिओ

Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.