• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शिवसेनेतर्फे नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन

by Ganesh Dhanawade
August 24, 2021
in Old News
16 0
0
गुहागर शिवसेनेतर्फे नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने गुहागर बाजारपेठेत मंगळवारी ना. राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे निषेधाच्या घोषणा देत दहन केले.
Shiv Sena is expressing anger over the controversial statement made by Union Minister Narayan Rane while criticizing Chief Minister Uddhav Thackeray on Monday. On this background, Guhagar taluka Shiv Sena on Tuesday burnt symbolic statue of Rane, in protest


सोमवारी रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज गुहागर तालुका शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांनी गुहागर शहराच्या मुख्य बाजारपेठ मध्ये मंत्री नारायण राणे याच्या वक्तव्याचा कडाडून निषेध केला. राणे यांच्या पुतळ्याचे दहन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अंगार हें, बाकी सब भंगार हें.., कोंबडी चोर राणे यांच्या वक्तव्याचा निषेध असो..अशा घोषणा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी  युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव, शिवसेनेच्या गुहागर तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. पारिजात कांबळे, युवासेना गुहागर उपतालुका प्रमुख उमेश खैर, शिवसेना गुहागर शहर प्रमुख नीलेश मोरे, युवासेना गुहागर तालुकाप्रमुख अमरदीप परचुरे, युवासेना गुहागर शहरप्रमुख राकेश साखरकर, प्रदीप सुर्वे, दीपक कनगुटकर, प्रभुनाथ देवळेकर, राज विखारे, विनायक जाधव, सारिका कणगुटकर, प्रभाकर झगडे, बाबू भोसले, राजू हरचिलकर, बाबू गुहागरकर आदिंसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
Central Minister, Narayan Rane, Jan Ashirwad Yatra, CM,  Uddhav Thackeray,

गुहागरच्या शिवसैनिकांनी केलेल्या निषेधाचा व्हिडिओ पहा.

Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.