गुहागर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये विशेष करून तालुक्यातील आबलोली व पालशेत या मध्यवर्ती असणाऱ्या गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर व आवश्यक असणाऱ्या गरजूंना मोफत चष्मे वाटप असा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार अडूर ५, पालशेत ३३, बुधल २, वेळणेश्वर २, बो-या- कारुळ २, वरवेली २, साखरी आगर ३, हेदवी १, नागझरी १, मासू २, शीर, कुडली, आंबेरे, सडे जांभारी, काजुर्ली, काताळे इत्यादी गावातील ७० लाभार्थींना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तालुक्यातून धन्यवाद देण्यात आले.
[bsa_pro_ad_space id=1]
कोरोनाच्या काळात गरीब, गरजूंना अन्नधान्य वाटप, सॅनिटायजर, मास्क वाटप, रक्तदान शिबीर, चाकरमानी मंडळींसाठी हेल्पलाईन, पक्षाकडून येणारे विविध कार्यक्रम, वैयक्तिक लाभाच्या योजना, आशा, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचा सन्मान असे अनेक समाजपयोगी उपक्रम भाजपाकडून गुहागर तालुक्यात यशस्वीपणे राबवून पक्षाचा प्रचार,प्रसार ग्रामीण भागात वाढवण्याचा प्रयत्न भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे व सर्व कार्यकर्ते करताना दिसत आहेत. यावेळी चष्मे वाटप कार्यक्रमाला लाभार्थीं बरोबरच तालुका सरचिटणीस सचिन ओक, विजय भुवड, विजय मसुरकर, प्रमोद सुर्वे, मधुकर देसाई, राजाभाऊ सुर्वे, गणेश बागकर, विनायक गुहागरकर, श्रीधर पिंपरकर दिपक पाटील या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे शासकीय नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.दिनेश जोशी, पालशेत येथील डॉ. बाळासाहेब ढेरे व बहुसंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होती