नीलेश सुर्वे, गुहागर भाजपचे मुख्यमंत्र्याना निवेदन
गुहागर, ता. 23 : ऑनलाइन शिक्षण (Online Education) हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. मुलांचे शिक्षणाबद्दलचे गांभीर्य नष्ट होत आहे. असून त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लास Give Permission to Private Tutions सुरु करावेत. असे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस Give Permission to Private Tutionsआहेत. या क्लासेसमधुन सुमारे दहा लाख खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना रोजगार (Employment) मिळतो. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचा रोजगार कोरोना महामारीमुळे बुडाला आहे. त्यांचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत. त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. तर पंधरा वर्षांवरील लसीकरण (vaccination) सुद्धा वेगाने होत आहेत. केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम (with Corona Guidelines) लावून शाळा (schools), महाविद्यालये (colleges) व कोचिंग क्लासेस (Private Tutions) सुरू करण्याची परवानगी द्यावी. सरकारने दिनांक २६ जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा.
अशी मागणी मुख्यमंत्री (chief Minister of Maharashtra) महोदयांकडे गुहागर (Guhagar) तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने (BJP) निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे (CM Uddhav Thackrey) पाठविण्यासाठी गुहागरच्या तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, आरे गाव सरपंच श्रीकांत महाजन, चिटणीस साईनाथ कळझुणकर, नगरपंचायत भाजप गटनेते उमेश भोसले, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरसेविका भाग्यलक्ष्मी कानडे, युवामोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष अमोल गोखले, श्रीमती अर्चना खरे, गणेश भिडे आदी भाजप कार्यकर्ते, शिक्षण प्रेमी उपस्थित होते.