प्रमोद जठार, उत्तरच द्यायचे असेल तर ठाकरी भाषेत उत्तर द्या
गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्यानी देशाच्या केलेल्या अपमानाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Central Minister Narayan Rane) ठाकरी भाषेत (Thakari Language) नारायण राणेंनी उत्तर दिले. उत्तरच द्यायचं असेल तर ठाकरी भाषेत उत्तर द्या. हे सरकार नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेसोबत (Jan Ashirwad Yatra) सुडबुध्दीने वागत आहे. असे प्रतिपादन नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार (Ex. MLA Pramod Jathar) यांनी पत्रकार परिषदेत केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमधील शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सायबर सेलकडे सोमवारी रात्री तक्रार केली. त्यानंतर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी मंगळवारी चिपळूणला पोलीसांचे पथक पाठवले. त्यांची ही माहिती जनआशिर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांना कळताच वालोपे (ता. चिपळूण) येथील हॉटेल परिसरात भाजप (BJP) कार्यकर्त्यांची गर्दी जमु लागली. माध्यमांमधुन नारायण राणेंना अटक होण्यासंदर्भातील बातम्या पसरु लागल्या. त्यामुळे जनआशिर्वाद यात्रेचे प्रमुख, माजी आमदार प्रमोद जठार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना जठार म्हणाले की, दौरा होणार, थोड्याच वेळात नारायण राणे जनआशिर्वाद यात्रेसाठी निघतील. सरकार सुडबुध्दीने काम करतयं. ही सुडबुध्दी किती असावी तर दौऱ्यामध्ये आम्ही सभागृह निश्चित करत होतो तेथेही आम्हाला अडचणी येत होत्या. आज केंद्रीय मंत्र्यांचा चिपळूण व रत्नागिरीमध्ये दौरा आहे. हे माहिती असताना अधिकारी मंडळी केंद्रीय मंत्र्याच्या आढावा सभेला येवू नये म्हणून पालकमंत्र्यांनी मुद्दाम डिपीडिसीची (DPDC) बैठक बोलावली आहे. राज्य सरकार सुडबुद्धीने वागतयं. ज्या वाक्यावरुन गोंधळ निर्माण केला गेला ती ठाकरी भाषा आहे. अनेक राजकीय नेते वेगळ्या शैलीत बोलत असतात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.आबा (R.R. Patil) (Aaba) देखील कोपरापासून ढोपरापर्यंत वापरायचे. ठाकरी भाषा ही देखील शैली आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत नारायण राणे ४० वर्ष होते. त्यामुळे राणेंची भाषा ही ठाकरी भाषा आहे. या ठाकरी भाषेवरच गुन्हे दाखल करायचे असतील तर दसरा मेळाव्यातील ठाकरे कुटुंबांच्या भाषणांवरही गुन्हे दाखल करावे लागतील. जर उत्तरच द्यायच असेल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर द्यावे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा कोणीही रोखू शकत नाही. 70 पेक्षा जास्त वय असलेले नारायण राणे यात्रेदरम्यान जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे सरकार घाबरले आहे. यात्रा रोखू पहात आहे. मात्र नियोजनाप्रमाणे यात्रा होणारच. राणे साहेबांना अटक झाली तर भाजपचे सर्व कार्यकर्ते अटक करुन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशाराही यावेळी यात्रे प्रमुख प्रमोद जठार यांनी दिला.
