चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचा उपक्रम
गुहागर, ता. 04 : चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचे मार्फत माध्यमिक विद्यालय अडूर, माध्यमिक विद्यालय वाघांबे, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा अडूर नं. १, जि .प .पूर्ण प्राथमिक शाळा अडूर भाटले तसेच जि. प. प्राथमिक शाळा नरवण या पाच शाळांना मोफत दृकश्राव्य सॉफ्टवेअर देण्यात आले. या इयत्ता पहिली ते दहावी शाळांच्या कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक विद्यालय अडूर येथे करण्यात आले होते. Gift of Audio Visual Software to Schools

चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चे प्रमुख श्री संजय देशपांडे, सौ प्रज्ञा देशपांडे यांनी समर्थ भारत अभियान प्रकल्प पुण्यात राबविला. त्याच प्रकारे कोकणातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट अभ्यासिकेची कल्पना त्यांच्यामार्फत अथक परिश्रमातून सुरू केली. दृकश्राव्य सॉफ्टवेअरचे मोफत वितरण श्री अशोक मराठे साहेब यांचे हस्ते करण्यात आले यावेळी श्री संजय देशपांडे यांनी स्मार्ट अभ्यासिकेविषयी सविस्तर माहिती दिली व सॉफ्टवेअरची सर्व वैशिष्ट्ये सांगण्यात आली. Gift of Audio Visual Software to Schools
या कार्यक्रमासाठी श्री विष्णु नराम, डॉ. कैलास वैद्य, आचार्य विनोबा भावे, शिक्षण प्रसारक मंडळ अडूरचे अध्यक्ष श्री पांडुरंग कापले, अडूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री खोत साहेब, डॉ. वैभव गाडगीळ, श्री संतोष विचारे, वाघांबे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अभय जोशी, अडूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आनंदराव चव्हाण, अडूर नं १ शाळेचे पदवीधर शिक्षक चंद्रकांत पागडे, अडूर भाटले शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन साळवी, संदिप काजारे, सौरभ रांजाणे, ओंकार मोरे उपस्थित होते. Gift of Audio Visual Software to Schools
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. माने यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय जोशी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी अडूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Gift of Audio Visual Software to Schools
