कबड्डी व कुस्तीपटु रमेश भोसले यांचे निधन
गुहागर, ता. 13 : शहरातील कबड्डी (Kabaddi), कुस्ती (Wrestling), पोहणे (Swimming), लोटण्या आणि हॉलीबॉल (Hollyball) या खेळांची मैदान गाजविणारा, अतिशय नम्र, सहृदयी खेळाडू (The friendly player lost) रमेश धोंडु भोसले यांचे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) शु्क्रवारी (ता. 12 नोव्हेंबर) रात्री 9.30च्या दरम्यान प्राणज्योत मालवली. शनिवारी वरचापाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तसेच ४ भाऊ त्यांची कुटुंबे असा मोठा परिवार आहे.
गुणवान खेळाडू
गुहागर शहरातील साखवीवर रहाणारे रमेश भोसले हे उत्तम खेळाडू होते. उंच, मजबूत अंगकाठी आणि व्यायामाने कमावलेले शरिर ही त्यांची बलस्थाने होती. याच बलस्थानांमुळे कुस्तीच्या अनेक स्पर्धा मध्ये त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत. वरचपाटमधील कै. विश्र्वास खरे व रमेश भोसले हे या दोघांनी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) या प्रतिष्ठीत स्पर्धेचे मैदानही गाजवले होते. खेळाडुंना कुस्तीतील डावपेच शिकविण्यात वाक्बगार म्हणून या दोन कुस्तीगीरांची ओळख होती. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण मंदिरात कुस्तीच्या स्पर्धाही त्यांनी भरविल्या. त्याकाळात या कुस्तीचा फार मोठा प्रचार न झाल्याने हे या गुणी खेळाडूला प्रसिध्दी मिळाली नाही.
रमेश भोसले यांना उत्कृष्ट कबड्डीपटु (Kabaddi Player) म्हणून ओळखले जायचे. सेव्हन स्टार संघाचे यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख होती. एकेकाळी रमेश भोसले मैदानात असतील तर सेव्हन स्टार जिंकणारच असे जणू समिकरणच बनले होते. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काही वर्ष सेव्हन स्टार संघाचे प्रशिक्षक, कबड्डीच्या स्पर्धांचे पंच म्हणूनही योगदान दिले.
हॉलीबॉल (Hollball) हा देखील त्यांचा आवडता खेळ होता. याशिवाय ते मल्लखांब (Mallakhamba) ही खेळायचे. भंडारी समाजात परंपरेने खेळला जाणारा क्रीडा प्रकार म्हणजे लोटण्या. गुहागरातील क्रमांक एकचे लोटी म्हणून त्यांची ओळख होती.
विनम्र माणूस
देहयष्टीला न शोभणारा विनम्रपणा आणि संयम ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य. खेळाचे मैदान असो वा नित्यनियमीत व्यवहार असतो रमेशदांना कधीही उर्मटपणे बोलतं नसतं. कोणावर संतापले आहेत. रागाच्या भरात कोणावर हात उगारला आहे. असे त्याच्याबाबतीत कधीच घडले नाही. उलट लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाजवळ आस्थेने बोलणे, समोरच्याचा सन्मान करणे हे गुण त्यांच्यात होते.
पापभिरु वृत्तीचा हा सहृदयी खेळाडू आज अचानक निघुन गेला. एकत्र कुटुंबात शुक्रवारी (ता. 12) रात्री एकाचा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर रात्रीचे जेवण झाले आणि नेहमीप्रमाणे रमेशदा घरातील सोफ्यावर सहज आडवे झाले. आणि काही कळायच्या आत दोनवेळा उचक्या येवून रमेशदांची प्राणज्योत मालवली. घराच्यासाठी हा मोठा धक्का होता. रमेशदांच्या निधनाची बातमी सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरल्यावर शहरातील सर्व क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. शनिवारी सकाळी 11.30 वाजता गुहागर वरचापाट येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश भोसले यांच्या आठवणी सांगताना संतोष मावळंकर म्हणाले की, गुहागरमधील पहिली छोटीशी व्यायामशाळा रमेश भोसले यांच्या घरापाठी होती. या व्यायामशाळेत वेगवेगळ्या वजनांचे डंबेल, लाकडी मुद्गल, मल्लखांब होता. जोर, बैठका, धावणे आणि सुर्यनमस्कार त्यानंतर साहित्य व्यायाम आणि मल्लखांब असा रोजचा व्यायाम रमेश करत असे. पोहणे रमेशचा आवडता छंद होता. विश्र्वास, रमेश, मी आणि अन्य मित्र दुर्गादेवीच्या तळ्यात किमान तीन तास पोहायचो. त्यावेळी संपूर्ण तळ्याला 25 फेऱ्या न थांबता मारण्याची स्पर्धा लागायची. श्र्वास कोंडून पाण्याखाली दोन मिनिट थांबण्याची क्षमता रमेशकडे होती.
कबड्डी खेळामधील प्रामाणिक खेळाडू अशी त्यांची ओळख होती. उत्तम चढाईकार असलेले रमेश भोसले बोनस गुण घेण्यात पटाईत होते. पण विरोधी संघातील खेळाडू त्यांच्या पायात घुसला की रमेश भोसले शरणागती पत्करायचे. खरतरं अफाट ताकद असल्याने थोडी मस्ती केली तर आपण लिलया विरोधी खेळाडूला बाद करु शकतो हे त्यांना माहिती होते. पण तशी मस्ती त्यांनी कधीच केली नाही.