शस्त्रास्त्रांसह तेल पुरवठा रद्द करण्याची दिली धमकी..
गुहागर, ता. 26 : युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यामुळे जगभरात एकाकी पडलेला रशिया आता भारतावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया आणि भारताची मैत्री जुनी आहे. तरी देखील रशियाने भारताला धमकावले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, जर भारताने रशियाला एफएटीएफ ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये समावेश होण्यापासून वाचवले नाही तर ते भारताबरोबरचे संरक्षण आणि ऊर्जा करार संपुष्टात आणील. Friend Russia was spoiled on India
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की एकाकी पडलेल्या रशियाने भारताकडे मदत मागितली आहे. एफएटीएफकडून दबाव वाढत असल्याने रशिया हैराण झाला आहे. एफएटीएफ मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर बंदी घालणारी संस्था आहे. Friend Russia was spoiled on India
जून महिन्यात या संस्थेची बैठक होणार आहे. या बैठकीत रशियावर निर्बांधांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत या संस्थेचा सदस्य आहे आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ज्यावेळी युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू झाले होते त्यावेळी एफएटीएफने रशियाचे सदस्यत्व समाप्त केले होते. त्यामुळे आता अशा देशांची मदत मागत आहे जे देश त्याला काळ्या यादीत जाण्यापासून वाचवू शकतील. Friend Russia was spoiled on India
युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक प्रतिबंध आहेत. यातच जर रशियाला ब्लॅकलिस्ट केले गेले तर हा देश उत्तर कोरिया, ईराण आणि म्यानमार या देशांच्या श्रेणीत गणला जाईल. जर ही कारवाई झाली तर एफएटीएफचे सदस्य बँक, गुंतवणूक कंपन्या आणि पेमेंट सिस्टम संदर्भात सावधानता बाळगावी लागेल. इतकेच नाही त्यांच्याकडे रशियाला प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार असेल. Friend Russia was spoiled on India
त्यामुळे रशिया या कारवाईपासून वाचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रशियाने आता धमकीसत्र सुरू केले आहे. जर एफएटीएफने काळ्या यादीत टाकले तर दोन्ही देशांतील रक्षा,ऊर्जा आणि अन्य क्षेत्रांतील करार धोक्यात येतील. ज्या करारांच्या संदर्भात रशियाने भारताला धमकी दिली आहे त्यात शस्त्रे निर्यात, तेल कंपन्यांसाठी रोसनेफ्ट आणि नायरा एनर्जी लिमिटेड कंपनीबरोबरील सहकार्य आणि रेल्वे कॉरिडोर विकास यांचा समावेश आहे. रशिया हा भारताला शस्त्र निर्यात करण्यात आघाडीवर आहे. मागील वर्षापासून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यातही रशियाने आघाडी घेतली आहे. Friend Russia was spoiled on India
