मनसेतर्फे अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील उपक्रम
गुहागर : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेले कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचे दृष्टचक्र संपेपर्यंत रोज रात्री मोफत भोजन व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष व हॉटेल राजगडचे मालक राजेश रमेश शेटे व कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात आली आहे. (Free Meal to Relatives of Corona Patient From MNS former Taluka president Rajesh Shete)
गुहागर तालुक्यातील अनेक कोरोना रुग्ण गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. लॉकडाऊनमुळे गुहागरात सर्व हॉटेल बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आता रात्रीच्या वेळी मोफत भोजन मिळत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी राजेश शेटे यांचे आभार मानले आहेत. राजेश शेटे यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी 4 टन लाकूड उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी मनसे माजी अध्यक्ष राजेश शेटे, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे , दिनेश निवाते, रुपेश घवाळे , नितीन कारकर, संदीप गोरीवले, तेजस फोकले, संकेत खांबे, भुवड आदी उपस्थित होते.


Rajesh Ramesh Shete, former president of Maharashtra Navnirman Sena and owner of Hotel Rajgad, and his family have provided free meals to the relatives and health workers of Corona patients at the rural hospital every night.