गुहागर ता. 27 : ग्रामीण भागातील तरुणांना करिअरमधील वेगळ्या क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून दयावर्दी प्रतिष्ठान, पालशेतने व्हिएफएक्स (VFX) तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (ता. 28 डिसेंबर) दुपारी 3.00 वा. पालशेत येथे होणार आहे. चिपळूणमधील ग्रीन लिफ ॲकेडमीचे हर्षल पेढे व सौ. सावली देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. आजकाल सर्वच चित्रपटांमध्ये धोकादायक, खर्चिक, अकल्पित दृष्यांचे चित्रीकरण VFX तंत्रज्ञानाने केले जाते. प्यार तो होना ही था या अजय देवगनच्या चित्रपटातील प्यार तो होना ही था या टायटलसाँगमध्ये व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तर लोकप्रिय झालेल्या बाहुबली चित्रपटातील बहुतांशी दृश्ये व्हिएफएक्स तंत्रज्ञानाने बनविण्यात आली होती. बाहुबलीमुळे या तंत्रज्ञानाची माहिती सर्वांधिक लोकांपर्यंत पोचली. आता तर हे तंत्रज्ञान छोट्या छोट्या मालिकांमधून, युट्युबवरील व्हीडिओंमधून सहज वापरता येते.
व्हिएफएक्स तंत्रज्ञानामुळे रोजगाराची नवी संधी या क्षेत्रात निर्माण झाली आहे. आपल्याकडे नवनवीन कल्पनांवर विचार करण्याची क्षमता असेल आणि व्हिएफएक्स तंत्रज्ञान वापरुन व्हीडिओ बनवता येत असतील तर रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्येही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इंटरनेटची सुविधा असेल तर आपण या क्षेत्रात घरबसल्या रोजगार उपलब्ध करु शकतो. याच गोष्टींचा विचार करुन हे तंत्रज्ञान आजच्या तरुणांनी समजुन घ्यावे म्हणून दर्यावर्दी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. चिपळूणमधील ग्रीन लिफ ॲकेडमीच्या मदतीने VFX तंत्रज्ञानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन दर्यावर्दी प्रतिष्ठानने केले आहे. हे मार्गदर्शन इ.१२ पासून पुढील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींसाठी मोफत आहे.
सोमवार, दिनांक २८ डिसेंबर,२०२० रोजी दुपारी 3.00 वाजता पालशेतमधील जयभारत मच्छिमार सहकारी सोसायटीच्या कार्यालयाजवळ श्री. वसंत तुकाराम पाटील यांचे निवासस्थानी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मागदर्शन शिबिराच्या अधिक माहितीसाठी दिनेश जाक्कर- ९४०५२०८७७३, निलेश पाटील- ८३७९९५९३५६, गणेश ढोर्लेकर- ९७६५४१२८७३, साईराज दाभोळकर- ७३७८४५८६९२, कु. जागृती पालशेतकर- ७२१९५७०१९९ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन दर्यावर्दी प्रतिष्ठानने केले आहे.