अध्यक्षपदी रत्नागिरीचे प्रभाकर कांबळे, जिल्हातील 23 जणांचा समावेश
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाडावे वाडी येथील कालीका कलामंचच्या सभागृहात 14 मार्चला कोकण नमन लोककला मंच (Konkan Folk Artist Group)महाराष्ट्र राज्य या मध्यवर्ती नमन संघटनेची स्थापना करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी खेर्डी (ता. रत्नागिरी) येथील बहुरंगी नमन लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक श्रीधर खापरे होते. रत्नागिरी तालुका शाखेचे सचिव विश्वनाथ गावडे यांनी स्वागत व सुत्रसंचलन केलं. रत्नागिरी शाखेचे सदस्य अरूण कळंबटे यांनी प्रास्ताविक केलं. लांजा शाखेचे अध्यक्ष मोहण घडशी, गजानन तटकरे, संगमेश्वर शाखेचे प्रवीण टक्के, युत्सुयु आर्ते, प्रदिप (पिंट्या) भालेकर, नितीन बांडागळे, चिपळूण शाखेचे भिकाजी भुवड, भाई कुळे, रत्नागिरी शाखेचे होरंबे, पि. टी. कांबळे, राजापूर शाखेचे पर्शुराम मासये, अशोक डोंगरकर, गुहागर शाखेचे जगन्नाथ शिंदे व प्रमोद घुमे यांनी आपल्या मनोगतातून नमन लोककलेची संघटना होणं गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हास्तरीय संघटनेच्या कार्यकारीणीसाठी तालुक्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोअर कमिटी तयार करण्यात आली. या कोअर कमिटीने चर्चेतून सुचक अनुमोदन पध्दतीने 23 जणांचा समावेश असलेल्या कार्यकारणीची निवड केली.
(In Ratnagiri Meeting Konkan naman folk artist group established on 14 th March 2021)
कोकण नमन लोककला मंचाची नवनिर्वाचित कार्यकारणी
अध्यक्ष – प्रभाकर तानाजी कांबळे (रत्नागिरी)
उपाध्यक्ष – मोहन गोविंद घडशी (लांजा)
उपाध्यक्ष – युत्सुसू आर्ते (संगमेश्वर)
सरचिटणीस – रवींद्र बा. मटकर (मुंबई)
सहचिटणीस – संतोष ह. कुळे (चिपळूण)
खजिनदार – सुधाकर मास्कर (गुहागर)
सदस्य – शाहिद खेरटकर (मुंबई)
सदस्य – झराजी विर (मुंबई)
सदस्य – परशुराम मासये (राजापूर)
सदस्य – अशोक डोंगरकर (राजापूर)
सदस्य – विजय मांडवकर (राजापूर)
सदस्य – चंद्रकांत पालकर (लांजा)
सदस्य – गजानन तटकरे (लांजा)
सदस्य – प्रदिप भालेकर (संगमेश्वर)
सदस्य – नितीन बांडागळे (संगमेश्वर)
सदस्य – कृष्णा जोगले ( संगमेश्वर)
सदस्य – विश्वनाथ गावडे (रत्नागिरी)
सदस्य – विलास भातडे (रत्नागिरी)
सदस्य – सुरेश दसम (रत्नागिरी)
सदस्य – भिकाजी भुवड (चिपळूण)
सदस्य – सुनील बळकटे (चिपळूण)
सदस्य – जगन्नाथ शिंदे (गुहागर)
सदस्य – प्रमोद घुमे (गुहागर)
कार्यकारीणीच्या निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले की, नमन या लोककलेचं जिल्हास्तरीय एकच संघटन आपण निर्माण केले आहे. त्यानुसार सर्व तालुका शाखा या मध्यवर्ती संघटनेचे निर्बंध पाळत व मध्यवर्ती संस्थेशी प्रामाणीक राहून संघटनेचं कामकाज करतील. आज पासूनच संस्थेचे कामकाजाला आपण सुरवात करत आहोत. कोरोनाच्या वाईट काळात नमन सादर करताना लोककलावंतांची होत असलेली पिळवणूक कुठे तरी थांबवावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देवून आपल्या व्यथा त्यांच्याकडे आजच मांडूया असे आवाहन त्यांनी केले.
उपाध्यक्ष मोहन घडशी म्हणाले की, संघटनेची वाटचाल करताना सर्व तालुका अध्यक्षांनी मध्यवर्ती कार्यकारणीच्या विचारांप्रमाणे वाटचाल करावी. त्यामुळे तालुका शाखा आणि मध्यवर्ती कार्यकारीणी मध्ये समन्वय राहील. आजच्या कार्यकारीणीमध्ये समावेश नाही असे अनेक अनुभव सभासद तालुका शाखांमध्ये आहेत. आवश्यकतेनुसार त्यांची मदत घेतली जाईल.
सरचिटणीस रवींद्र मटकर म्हणाले की, आपण आता संघटीत झालो आहोत. आपल्यावर समस्त तालुका संघटनांनी विश्वास दाखविली आहे. या संघटनेचा सचिव या नात्याने माझ्या कार्य आणि कर्तृत्वातून सर्वोत्तम सेवा देण्याचे अभिवचन देतो.
खजिनदार सुधाकर मास्कर म्हणाले की, खजिनदार पदाची जबाबदारी मी प्रामाणिक राहून पार पाडेन. संघटनेचा अर्थकरणाचा भाग सबळ कसा होत जाईल या प्रती मी माझं योगदान प्रामुख्याने देण्यावर भर देईन. कुठेही हेवेदावे न करता संघटना आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करत राहील अशा पध्दतीची आपण कार्यपध्दती अवलंबू.
सरतेशेवटी सभेचे अध्यक्ष श्रीधर खापरे म्हणाले की, संघटित ताकदीतून लोककलेला आणि कलावंताना शासन दरबारी न्याय मिळवून दिल्याशिवाय आता थांबायचे नाही. असा निर्धार मनाशी पक्का करुया. एकमेकांचा आदर राखत, सुसंवाद साधत, ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. रत्नागिरी शाखेचे सदस्य विलास भातडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आदी तालुक्यातील व मुंबईतील नमनकरी उपस्थित होते.
Related News
नमन कलावंतांना राजाश्रय व लोकाश्रय मिळावा
शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर