गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनारी शुक्रवारी (ता. 24) दुपारी 3.30 च्या सुमारास एक मृतदेह सापडला. सदर मृतदेह सुनिल गजानन सुर्वे (वय. 43), रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा यांचा असल्याचे समोर आले. सुनिल सुर्वे बुधवार (ता. 22) पासून बेपत्ता होते.
या घटनेबाबत पोलीस ठाणे गुहागर येथून मिळालेल्या माहिती नुसार सुनिल सुर्वे 22 सप्टेंबर रोजी बोटीतून खाडीत पडले होते. नातेवाईकांनी या संबंधीची खबर 22 सप्टेंबरला रात्री 8.30 वाजता गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. गेले दोन दिवस तवसाळ मधील ग्रामस्थ सुनिल सुर्वे यांचा शोध घेत होते. शुक्रवारी (ता. 24) रोजी दुपारी तवसाळ समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीजवळ मनुष्याचा मृतदेह आला असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. म्हणून ग्रामस्थ घटनास्थळी गेले तेव्हा सदर मृतदेह सुनिल सुर्वे यांचाच असल्याची ओळख पटली. तवसाळ खुर्द येथे रहाणारे संतोष भार्गव सुर्वे यांनी याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करुन पोलीसांनी सुनिल सुर्वे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कादवडकर करीत आहेत.

A body was found on the beach of Tavasal in Guhagar taluka around 3.30 pm on Friday (Sept 24). The body was identified as Sunil Gajanan Surve (age 43), resident of Tawasal Khurd Bhandarwada. Sunil Surve has been missing since Wednesday (Sept. 22). Sunil Surve had fallen into the creek on September 22 from a boat. The relatives had informed the Guhagar police station on September 22 at 8.30 pm. For the last two days, villagers in Tavasal were searching for Sunil Surve. Santosh Bhargava Surve informed the police. After that Assistant Police Inspector B. K. Jadhav visited the spot. The police have registered as accidental death of Sunil Surve.Further investigation is being conducted by Police Head Constable Kadwadkar.
