बाईत पितापुत्रांचा पराभव, परिवर्तनचे दोन उमेदवार विजयी
गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. गुहागर तालुक्यातील विकास संस्था मतदार संघातून डॉ. अनिल जोशी, नरवण विजयी झाले. विद्यमान संचालक चंद्रकांत बाईत आणि शिवसेना तालुकाप्रमुख सचीन बाईत यांचा या निवडणूकीत पराभव झाला आहे. Ratnagiri District Central co operative (RDCC) Bank election results were announced today. From Vikas Sanstha constituency in Guhagar taluka, Dr. Anil Joshi, Narvan (Sahakar Panel) won. Incumbent director Chandrakant Bait and Shiv Sena taluka chief Sachin Bait have lost the election.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 14 जागांवर डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. 7 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील 5जागांवर सहकार पॅनेलचे तर 2 जागांवर परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. Elections were declared for 21 director posts of Ratnagiri District Central Bank. Out of them, 14 Candidates of Dr. Tanajirao Chorge’s all-party Sahakar panel were elected unopposed. Elections were held for 7 seats. Out of these, 5 seats were won by Sahakar Panel and 2 seats were won by Parivartan Panel.
सहकार पॅनलमधील पराभव पत्करावा लागणारे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असल्याने शिवसेनेला सहकार क्षेत्रात हा जोरदार धक्का आहे. परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा दोन हा आकडा छोटा दिसला असला तरीही आम्ही निवडणूक बिनविरोध करणार असे सांगत सर्वपक्षीय पॅनल स्वतःच निवडणाऱ्या जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना हा धक्का आहे.
सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. ज्या 7 पदांसाठी निवडणूक झाली. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
मजूर संस्था मतदार संघात सहकार पॅनेलच्या दिनकर गणपत मोहिते (48 मते) (विजयी), यांनी राकेश श्रीपत जाधव (45 मते) पराभव केला.
नागरी पतसंस्था मतदारसंघात सहकार पॅनेलच्या संजय राजाराम रेडीज यांना 66 मते (विजयी) मिळाली. तर ॲड. सुजित भागोजी झिमण 56 मते मिळाली.
दुग्धसंस्था मतदारसंघात परिवर्तन पॅनेलचे अजित रमेश यशवंतराव (25 मते)(विजयी) गणेश यशवंत लाखण (10 मते) यांचा 15 मतांनी पराभव केला.
रत्नागिरी तालुका मतदारसंघात सहकार पॅनेलच्या गजानन कमलाकर पाटील यांना 33 (विजयी) तर प्रल्हाद महादेव शेट्ये 8 मते मिळाली.
लांजा तालुका मतदार संघात परिवर्तन पॅनेलचे महेश रवींद्र खामकर यांनी (18 मते) (विजयी) आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना (16 मते) पराभव केला.
गुहागर तालुका विकास संस्था मतदारसंघात सहकार पॅनेलच्या अनिल विठ्ठल जोशी यांनी (13 मते) चंद्रकांत धोंडू बाईत (8 मते) यांचा पराभव केला.
विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे (692 ) हे विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध गुहागरचे शिवसेना तालुका प्रमुख सचिन चंद्रकांत बाईत (164 मते) उभे होते. सुरेश मारूती कांबळे 528 मतांनी निवडून आले.
डॉ. अनिल जोशी यांचा विजय महत्त्वपूर्ण
जिल्हा बँकेच्या निवडणूका जाहीर झाल्या त्यावेळी सहकार पॅनेलमधुन डॉ. अनिल जोशी बरोबरच चंद्रकांत बाईत हे देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी सर्वपक्षीय सहकार पॅनेलची घोषणा करताना चंद्रकांत बाईत यांना उमेदवारी दिली नाही. त्याच दरम्यान गुहागरमधून निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारे पंकज बीर्जे यांच्यासह तालुक्यातील जानवळे, चिखली, पेवे, पालशेत, अंजनवेल, कोळवली, शीर, मुंढर या 8 विकास संस्थांचा मतदान प्रतिनिधी बाद झाले. त्यामुळे डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनेलच्या भूमिकेबाबत गुहागरमधील सहकार क्षेत्रात तीव्र नाराजी निर्माण झाली. मतदार प्रतिनिधी म्हणून बाद झालेल्या संस्थांच्या पुढाकारातून एक सभा पाटपन्हाळे येथे झाली. याच सभेत चंद्रकांत बाईत आणि शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना सहकार पॅनेलच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे गुहागरमधील विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघात डॉ. जोशींसमोर आव्हान उभे राहीले होते. अवघ्या 21 मतदारांनी उमेदवार निवडून द्यायचा होता. दोघांनी तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकत्र काम केले होते. सर्व मतदारांजवळ दोघांचाही संपर्क होता. शिवाय चंद्रकांत बाईत हे एकेकाळी गुहागर पंचायत समितीचे सभापती होते. राजकारणातील चेहरा म्हणून ते परिचित आहे. अशा परिस्थितीतही डॉ. अनिल जोशी यांनी 18 मते घेत चंद्रकांत बाईत यांचा पराभव केला आहे.