(भाग 13)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
आजच्या भागामध्ये आपण मधुमेहामुळे शरीराच्या आणखी कोणत्या अवयवांवर दुष्परिणाम होतात, ते पाहूया.
कानास ऐकू न येणे (बहिरेपणा)
मधुमेही रुग्णात सामान्यांपेक्षा बहिरेपणाचे प्रमाण दुप्पट आढळते. कानाच्या शिरा खराब झाल्याने बहिरेपणा येतो. मधुमेहावर नियंत्रण हाच ह्याचा उपाय आहे.
तोंडाचे विकार
मधुमेहीत तोंडाचे विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हिरड्यांचे आजार, सतत तोंड येणे, तोंड कोरडे पडणे, दात किडणे, इ. विकार आढळतात. दंत तज्ञांकडून वरचेवर तपासणी, तोंड स्वच्छ ठेवणे व मधुमेहावर नियंत्रण ठेवणे यासाठी आवश्यक आहे.
मज्जातंतू
मधुमेहीत वाढलेल्या रक्तशर्करेमुळे व उच्च रक्तदाबामुळे सर्व शरीरातील मज्जातंतूंवर विपरीत परिणाम दिसून येतो. याने पचनशक्ती, संभोगक्षमता कमी होते. इतरही खूप दुष्परिणाम आढळून येतात. विशेषतः पायातील मज्जातंतूंवर परिणाम होतो. ह्याला पेरिफेरल न्युरोपथी म्हणतात. ह्याने पायात वेदना, जळजळ, पायास मुंग्या येणे, स्पर्शज्ञान कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
स्पर्शज्ञान कमी झाल्याने पायास जखमा होतात व त्या कळत नाहीत. त्यात पू होतो. जखमा चीघळतात, कधी कधी तर पाय अथवा बोटे कापून टाकावी लागतात. २५% मधुमेहीत हा दुष्परिणाम आढळून येतो. तसेच ह्यामुळे पायास भेगा पडतात, पायांची कातडी सोलून निघते.
यावर उपाय म्हणजे मधुमेह आटोक्यात ठेवणे, पायांची काळजी घेणे, वेदनाशामके वापरणे, जळजळ व पायांना येणाऱ्या झिणझिण्या वा मुग्यांवर औषधोपचार करणे हे होय. वरचेवर पायांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पायास जखमा होऊ न देणे व झाल्यास त्याची पूर्ण काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 13…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
भाग 9 : समजून घ्या HBA1C चाचणी
भाग 10 : मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
भाग 11 : मधुमेहींवर उपचार करताना…
भाग 12 : मधुमेहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही, sugar test, साखरेची तपासणी, Health, आरोग्य, जीवनशैली, Treatment,