• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सायकल फेरीने शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार

by Mayuresh Patnakar
December 24, 2022
in Ratnagiri
48 0
0
Ratnagiri District Cycle Meet
94
SHARES
268
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली सायकलिंग क्लबतर्फे २५ डिसेंबरला सायकल फेरी

गुहागर, ता. 24 : दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २५ डिसेंबर २०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. Cycle tour by cycling club

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती उदयनगर- लष्करवाडी- फणसाचे वाकण- चैतन्य नगर- अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स- इच्छापूर्ती गणेश मंदिर- नॅशनल हायस्कुल- आझाद मैदान अशी ५ किमीची असेल. समारोप आझाद मैदान येथे ९:३० वाजता होईल. मातीतून सोने उगवणाऱ्या शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मार्गावरील काही शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येईल. वेलकम नर्सरी, अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स येथे वेगवेगळी पिके, शेतीच्या पद्धती, झाडांबद्दल माहिती करुन घेण्यात येईल. Cycle tour by cycling club

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८३०८३६६३६६, ८७६७६५०५३७ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle tour by cycling club

Share38SendTweet24
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.