पर्यावरण मंत्री जावडेकर स्वत: लक्ष घालणार; डॉ. नातूंना लेखी आश्र्वासन
गुहागर, ता. 05 : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेवून भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विनय नातू यांनी या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती. या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी गुहागर नगरपंचायत क्षेत्र सीआरझेड तीन मधुन सीआरझेड दोन मध्ये वर्ग करण्यात मी लक्ष घालत आहे. असे डॉ. नातूंना पाठवले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्र सीआरझेड २ मध्ये येण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
मार्च महिन्यात अधिवेशनाच्या काळात भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातु यांनी दिल्लीत जावून गुहागर नगरपंचायत सीआरझेड, गुहागर विजापूर रस्ता, मोडकाआगर पुल आदी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांबाबत केंद्रीय मंत्री आणि खासदारांची भेट घेतली होती. हा दिल्ली दौरा गुहागरकरांसाठी यशस्वी ठरला आहे. मोडकाआगर पुलाचे काम मे 2021 अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्र्वासन वहातुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. (The bridge construction at Modakanagar is likely to Completed by May 2021- Nitinji Gadkari)
अवघ्या 15 दिवसांत वहातुक नितिन गडकरी यांनी रामपुर ते चिपळूण या महामार्गाच्या कामाला निधी मंजुर करुन दिला. (171 Cr. approved for upgradation of guhagar chiplun road NH166E.)
त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुहागर नगरपंचायतीच्या विषयात लक्ष घालत असल्याचे पत्र डॉ. नातूंना पाठवले आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये खासदार सुनील तटकरेंच्या (MP Sunil Tatkare) नेतृत्त्वात गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्यासह हॉटेल व्यावसायिकांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन समितीच्या अध्यक्षा सौ. मनिषा म्हैसकर (IPS Manisha Mhaiskar) यांची भेट घेतली. कायद्यात तरतुद असुनही 2012 साली स्थापन झालेल्या गुहागर नगरपंचातीला सीआरझेड २ मध्ये वर्ग केले नसल्याची माहिती यावेळी राजेश बेंडल यांनी दिली. त्यानंतर एमसीझेडएमएच्या (MCZMA) बैठकीतही या विषयाची चर्चा झाली. मात्र गुहागर नगरपंचायतीच्या झोनमधील बदलाबाबतची अधिसुचना अद्याप निघालेली नाही. त्यामुळे डॉ. विनय नातू यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेवून गुहागर नगरपंचायतीचा विषय सांगितला. दिल्ली दौऱ्यावरुन परत आल्यावर याबाबतचे पत्र जावडेकर यांना पाठवले होते. या पत्राला उत्तर देताना गुहागर नगरपंचायतीच्या सीआरझेड क्षेत्राच्या बदलामध्ये मी लक्ष घालत आहे. असे आश्र्वासन जावडेकर यांनी दिले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्र सीआरझेड २ मध्ये येण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
(Central Environmental Minister Prakash Javdekar Wrote a letter to Dr. Vinay natu. In this Letter He ensured about looking in Reclassification of Guhagar Nagarpanchyat.

