31 गावांमध्ये 138 रुग्ण, शिमगोत्सव व लग्न सराई कारणीभूत
गुहागर, ता. 9 : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होताना कोरोनापासून गुहागर दूर होते. मात्र शिमगोत्सव, लग्नसराई आणि मुंबईतून होणारी ये जा वाढल्यावर गुहागरमध्ये कोरोना वेगाने पसरु लागला आहे. दुसऱ्या लाटेत तालुक्यातील 31 गावांमध्ये 137 रुग्णांची नोंद आहे. कोतळूक, मढाळ, रानवी ग्रामपंचायत व गुहागर नगरपंचायत क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या १० पेक्षा अधिक आहे.
After Shimgotsav Corona is spreading fast in Guhagar Tahasil. on 9th April 137 Corona Patient registered in 31 village including Guhagar Nagarpanchyat. Between those 120 patients are Home isolated.
गुहागर तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 954वर पोचली आहे. सुदैवाने मृतांचा आकडा केवळ 13 वर सिमित आहे. आज तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 137 आहे. त्यापैकी 120 कोरोना बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर 7 रुग्ण कामथे उपजिल्हा रुग्णालय, 2 रुग्ण रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, 2 रुग्ण चिपळूणमधील खासगी दवाखान्यात, 3 रुग्ण डेरवण रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित 3 रुग्ण जिल्हाबाहेर गेले आहेत.
तालुक्यातील कोतळूकमध्ये सर्वाधिक 31 रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मढाळमध्ये 20, गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात 13 आणि रानवी ग्रामपंचायत क्षेत्रात 13 असे रुग्ण आहेत. रानवीमध्ये आरजीपीपीएल कंपनीची वसाहत आहे. त्यामध्येच 9 कोरोना रुग्ण आहेत. गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या शृंगारतळीमध्ये दुसऱ्या लाटेत केवळ 10 रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील जानवळेमध्ये 5 कोरोना बाधित, हेदवतड(5), पाचेरी सडा (4), अडूर (4), नवानगर (3), भातगांव 3 अशी रुग्ण संख्या आहे. कुडली, पालपेणे, खोडदे, पोमेंडी, वरवेली, पाटपन्हाळे, पिंपळवट या गावात कोरोनाचे प्रत्येकी 2 रुग्ण आहेत. तर आंबेरे, वेळंब, पालशेत, कोळवली, तळवली, सडेजांभारी, कुटगिरी, काजुर्ली, कारुळ, वाघांबे, वेलदूर, तवसाळ, धोपावे येथे कोरोनाचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा.