केंद्रीय मंत्री नारायण राणे ९ लोकसभा मतदारसंघात फिरणार
रत्नागिरी, ता. 13 : मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Central Minister Narayan Rane) यांची जनआशिर्वाद यात्रा (Jan Aashirwad Yatra) महत्त्वाची आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार आहेत. या यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांना भेटणार आहेत. तसेच पर्यटन विकासासाठी व्यावसायिकांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जन आशिर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज जनआशिर्वाद यात्रेची माहिती देण्यासाठी रत्नागिरी येथील भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात प्रमोद जठार (Pramod Jathar) यांनी पत्रकार परिषद घेतली. जठार म्हणाले की, केंद्रातील भाजपच्या सरकारने अनेक विकासाभिमुख योजना आणल्या, त्या तडीस नेल्या आणि असंख्य लोकाभिमुख कामे केली. गेल्या ७ वर्षांत भरपूर समस्या सोडवण्यात यश मिळाले. आता जनसेवक या नात्याने जनतेला नम्रपणे भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा ( BJP National President J. P. Naddha) यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार (All BJP MP) आपापल्या मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावाधीत जनआशिर्वाद यात्रा करणार आहेत. ही यात्रा सुमारे एक हजार किलोमीटर (1 Thousand KM) प्रवास करुन ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोचले. यात्रेमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह २०० जण सहभागी होणार आहेत. १९-२० ऑगस्टला मुंबई शहर, आणि उपनगरात (19-20 Augest Mumbai City and Suburban), २१ ला वसई व विरार (21st Aug – Vasai & Virar) , २३ ऑगस्टला पालीच्या महागणपतीचे दर्शन घेऊन यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करेल (on 23th Aug Yatra will stast From Pali, Raigad). २३ ऑगस्टला संध्याकाळी चिपळूणमध्ये मुक्काम (Chiplun) , २४ ला रत्नागिरीत मुक्काम (Ratnagiri) व २५ ला कणकवलीमध्ये (Kankavali) मुक्काम आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होईल.
जनआशीर्वाद यात्रेमध्ये स्वाभाविकपणे रत्नागिरी रिफायनरीचा (Ratnagiri Refinery) मुद्दा मांडला जाईल. तरुणांना रोजगार (Employment) मिळण्यासाठी रिफायनरी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करतोय. याशिवाय कोयनेचे पाणी कोकणात फिरवून पाण्याचा दुष्काळ दूर करणे, कोस्टल हायवे (Coastal Highway) व अन्य विकास प्रकल्प हे मुद्देही जनआशीर्वाद यात्रेच्या केंद्रस्थानी असतील. असे ही यावेळी यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतुल काळसेकर, राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार आदी उपस्थित होते.