• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डायबेटीस होण्याची कारणे

by Guhagar News
December 10, 2021
in Health
21 0
2
डायबेटीस होण्याची कारणे
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp
(भाग 3)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.

शरीराला एनर्जी पुरविण्याचे काम ही साखर करते. ती फक्त जिलेबी,  चॉकलेट किंवा गोड पदार्थातून मिळत नसून इतर स्टार्चयुक्त पदार्थातूनही मिळते. प्रत्येक पदार्थाला साखर निर्मितीची विशिष्ट क्षमता असते म्हणजेच आधुनिक भाषेत त्यास ग्लायसेमिक इंडेक्स (Glycaemic Index)म्हणतात.
पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरामध्ये स्वादुपिंड द्वारा निर्मित इन्सुलिन तयार होते व साखरेचा समतोल राखते. शरीराच्या इतर भागामध्ये असलेल्या पेशींना इन्सुलिन उत्तेजित करते  व आवश्यक साखर रक्तातून पेशींना मिळते. रक्तातील साखर वाढली की जास्त इन्सुलिन निर्मिती होते. यातील सुसंवाद बिघडला की डायबेटीस तयार होतो.

मधुमेहाची अनेक कारणे आहेत.

१. जनुकीय कारण :
अनुवंशिकता आणि मधुमेह यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. एका जनुका मधील दोषामुळेच काही मधुमेह निर्माण होत नाही तर अनेक जनुकांचा संबंध असतो. उदा. टाईप I डायबेटीस मध्ये गुणसूत्र क्रमांक 6P21 व 11P15 यांच्यातील बिघाडा मुळे होतो.

२. इपिजेनिक घटक:  
एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुके दिले जातात. प्रजनन काळात व वयात जनुकांच ट्रान्समिशन होत असते. अनेक रासायनिक प्रक्रिया पेशीत घडत असतात व जनुकांमध्ये बदल होतात व पुढील पिढीत विपरीत परिणाम दिसतो यास एपिजेनिक घटक म्हणतात.

३. जिनोमिक्स घटक :
माणसात शरीरातील पेशींमध्ये असलेल्या गुणसुत्राला व त्यांच्या गुंतागुंतीच्या रचनेला जिनोम (Genome) म्हणतात . त्यांचा अभ्यास म्हणजेच जिनोमिक्स होय. जिनोमिक्स अभ्यासाद्वारे अनुवंशिक मधुमेह व त्यांचा कार्यकारण भाव शोधता येतो.

भाग 3…(क्रमशः)

रत्नागिरीमधील अपेक्स हॉस्पीटलमध्ये मधुमेहींसाठी 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज केवळ 50 रुग्ण तपासण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी 8482948439 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.

संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?

Sugar provides energy to the body. It is not only found in chocolates or sweets but also in other starchy foods. Each substance has a specific ability to produce sugar, which is called as Glycemic Index. After eating, the insulin produced by the pancreas in our body. It maintains the sugar balance. Insulin stimulates the cells in other parts of the body and the cells get the necessary sugar from the blood. As blood sugar rises, more insulin is produced. Diabetes develops when the communication between them deteriorates.
A free camp for diabetics has been organized at Apex Hospital in Ratnagiri from September 22 to October 5. Only 50 patients will be examined daily. To register, call 8482948439.


Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.