दि. ३० रोजी कुणबी समाजोन्नती संघ व कुणबी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोली,गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये निवड व नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High...
Read moreDetailsशेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition Result राज्य सरकारने सन 2022-23 या वर्षात खरीप पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर क्रमांक काढण्यात येणार होते. प्रत्येक स्तरावरील सरासरी पिकापेक्षा जास्त पिक घेणारे शेतकरीच त्या स्तरासाठी पात्र होतील. तसेच ज्या स्तरासाठी शेतकरी पात्र झाला असेल त्या खालील स्तरावर त्या शेतकऱ्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी होत्या. भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्यातील शेतकरी राज्य आणि विभाग स्तरासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील पोमेंडीचे शेतकरी अनंत भिवाजी रांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आपल्या शेतात 87.38 किलो प्रति गुंठा या प्रमाणात भात उत्पादित केले. त्यांना रोख रु. 10 हजार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्याचे सरासरी क्षेत्र 3889 असून सरासरी 30.75 किलो प्रति गुंठा भात उत्पादन होते. यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आणखी तीन शेतकरी तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले. तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवली येथील नीलेश दामोदर पवार यांनी 66.72 किलो प्रति गुंठा भात उत्पादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रु....
Read moreDetailsप्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता. गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. Sangit Visharad_Suvidha Oak या सांगितिक प्रवासाबद्दल सौ. सुविधा ओक म्हणाल्या की, गुहागरसारख्या तालुक्यात संगीताचे विशेषत: नाट्यसंगीताचे वेड असलेली मंडळी आहेत. प्रत्येक गावात भजन मंडळे आहेत. मात्र येथे गाण्याची, वादनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय नाही. ही उणीव असल्याने विवाहापूर्वी उपांत्य विशारद पर्यंत पोचुनही संगीत विशारद ही पदवी मिळविण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. आता गायनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय शिक्षण मिळण्यासाठी मी स्वत: संगीत विद्यालय सुरु करणार आहे. स्वरानंद या संगीत विद्यालयाद्वारे सुरवातीला गायनाचे शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. भविष्यात हार्मोनियम, तबला आदी शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Sangit Visharad_Suvidha Oak
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उध्दारकर्ते, लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी...
Read moreDetailsएक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचालित एक्सलंट अकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी कुमार सोहम प्रकाश गुरसळे हा JEE 2023 परीक्षेत General गटात 4322...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीच्या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. रुद्र ऋषिकांत पवार याने 300 पैकी 228 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा तर...
Read moreDetailsझाडे लावा झाडे जगवा - तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे गुहागर, ता. 25 : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने शहरातील अनेक...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याबद्द्ल महाराष्ट्र राज्य पेंशन संघटना सेवा समिती गुहागरचे वतीने...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने भाजप उत्तर रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्री दुर्गा मातेची प्रतिमा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला....
Read moreDetailsमांडकी-पालवण येथील डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शिक्षण संस्थेला मंजूर रत्नागिरी, ता. 25 : महिलांचा कृषि शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषद, पुणे यांनी डॉ. तानाजीराव चोरगे...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन...
Read moreDetailsबंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करा; विनोद जानवळकर गुहागर, ता. 24 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक यांना बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा...
Read moreDetailsआईसह दोन मुले जखमी, गुहागरात मुसळधार गुहागर, ता. 23 : तालुक्यात शनिवारी रात्री पासूनच पावसाचा जोर वाढला होता. Heavy Rain in Guhagar रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. साखरी बुद्रुक परिसराला...
Read moreDetailsगुहागर भाजपतर्फे विविध उपक्रम गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून हा सेवा दिन साजरा केला....
Read moreDetailsपगार व गेट पास देणार; अधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील अँकर सिक्युरिटी सर्व्हिस या ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती...
Read moreDetailsसंजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर (मयूरेश पाटणकर)गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचा तोटा सलग दोन वर्ष 175...
Read moreDetailsमहाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये...
Read moreDetailsगुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने त्याला अडकून राहील्याने त्याचा जीव वाचला. जखमी वायरमनवर चिपळूण येथील...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.