• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांनी घेतले रक्तगट तपासणी शिबीर

by Mayuresh Patnakar
November 21, 2022
in Guhagar
33 0
0
Blood group testing camp

Blood group testing camp

64
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रिगल कॉलेज नर्सिंग केयर व डिएमएलटी विभागाचा उपक्रम

गुहागर, ता. 18 : (Blood group testing camp) रिगल कॉलेज शृंगारतळीमधील नर्सिंग केयर व डिएमएलटीच्या  विद्यार्थींनींनी पालपेणेमधील वरदान हायस्कूल मध्ये रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी केली. तपासणी करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाचे कार्डही देण्यात आले.

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविले जातात. 1 वर्ष कालावधीचा नर्सिंग केअर आणि 2 वर्ष कालावधी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT) हे अभ्यासक्रम रिगल कॉलेजमध्ये आहेत. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे म्हणून रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीच्या उपक्रमाचे (Blood group testing camp) आयोजन करण्यात आले होते.  नर्सिंग केअर आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT) च्या विद्यार्थिनी या उपक्रमांतर्गत पालपेणे येथील वरदान न्यू इंग्लिश स्कुलमध्ये गेली.

Blood group testing camp

शिबिराच्या उद्‌घाटनाचे वेळी नर्सिंग केयरच्या  प्राध्यापिका सौ. तनुजा अडूरकर म्हणाल्या की, नर्सिंग केयर व डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT) हे कोर्स पूर्ण केल्यानंतर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात, आरोग्याविषयक तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये  नोकरीच्या संधी आहे. तसेच आपण नर्सिंग ब्युरोचे सभासदत्त्व घेतल्यानंतर स्वतंत्रपणे नर्स म्हणून व्यवसाय करु शकतो. स्वतःची पॅथलॉजी लॅब स्थापन करु शकतो. या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमातून उदरनिर्वाह करता येतो त्याशिवाय समाजसेवा केल्याचे समाधानही मिळते.

उद्‌घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांना रक्तगट म्हणजे काय, त्याचे प्रकार, हिमोग्लोबिनची शरीराला असलेली आवश्यकता, ते किती प्रमाणात शरीरात असावे. या तपासणीची प्रक्रिया कशी केली जाते. कोणती सोल्युशन्स वापरली जातात. याची माहिती नर्सिंग केअर आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT) च्या विद्यार्थिनींनी दिली. त्यानंतर रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीला सुरवात केली. तपासणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणीचे कार्ड देण्यात आले.

रिगल कॉलेज (Regal College)मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देताना प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी सांगितले की, शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये घेण्यात येणारे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्य विकासावर आधारीत आहेत. हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००% नोकरी मिळते. किंवा व्यवसाय करणे सहज शक्य असते. Hotel Management Diploma, Fashion Designing Diploma, Diploma in Medical Lab Technician (DMLT) हे अभ्यासक्रम दोन वर्षांचे आहेत. तर Nursing care हा अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. याशिवाय रिगल खासगी आयटीआयमध्ये Electrician, Welder, Diesel Mechanic, Architectural Draftsman, Civil Draftsman, Computer Operator and Programming Assistant  असेही अभ्यासक्रम घेतले जातात. हे सर्व अभ्यासक्रम शासनमान्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीनंतर कौशल्य विकसीत करणाऱ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घ्यावे आणि नोकरी किंवा व्यवसाय करावा. असे आवाहन सौ. रेश्मा मोरे यांनी केले.

या शिबिरासाठी पालपेणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हसबे सर व सर्व सहाय्यक शिक्षकांचे सहकार्य लाभले.रिगल एज्युकेशन सोसायटीचे (Regal College)अध्यक्ष संजय शिर्के,संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.

Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, रक्तगट, हिमोग्लोबिन, Blood group, hemoglobin, Nursing care, Nursing, ‌DMLT, Hotel Management Diploma, Fashion Designing Diploma, Diploma in Medical Lab Technician (DMLT), Nursing care, Regal College, ITI,  Electrician, Welder, Diesel Mechanic, Architectural Draftsman, Civil Draftsman, Computer Operator,  Programming Assistant,

Share26SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.