गुहागर, ता. 9 : एस.टी.च्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी 10 नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पोटासाठी आम्ही संप करत आहोत. मात्र रोज आगारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम व्हावे या हेतूने आम्ही हा उपक्रम करत आहोत. या रक्तदान शिबिराला गुहागरमधील व्याडेश्र्वर देवस्थान आणि दुर्गादेवी देवस्थाने सहकार्य केले आहे. अशी माहिती गुहागर आगारातील कर्मचारी सुभाष पावसकर यांनी दिली. (Maharashtra State Transport Corporation’s Guhagar Depot liaison staff i.e. ST workers has organized a blood donation camp on Wednesday, November 10. This blood donation camp is supported by Vyadeshwar Devasthan and Durgadevi Devasthan in Guhagar. This information was given by Subhash Pawaskar.)
राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. (ST workers have called a statewide strike to demand the merger of the corporation with the Maharashtra State Government.) एकमेकांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी गुहागर आगारातील संपात सहभागी झालेले कर्मचारी दोन दिवस एकत्र येत आहेत. या वेळी सामाजिक बांधिलकीपोटी काही उपक्रम करु शकतो का अशी चर्चा झाली. या चर्चेतून संपकरी कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. छावा प्रतिष्ठानच्या रत्नागिरीमधील कार्यकर्त्यांनी हा उपक्रमासाठी थेट जिल्हा रुग्णालयात विचारणा केली. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजनासाठी अनुमती दिली. त्यामुळे बुधवार, 10 नोव्हेंबरला गुहागर आगारातील दत्त मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. या रक्तदान शिबिराला सुरवात होईल. सुमारे 100 रक्तदाते रक्तदान करतील. असे लक्ष्य एस.टी. कर्मचाऱ्यांनी ठेवले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी खाटा, गाद्या आदी साहित्य गुहागरमधील व्याडेश्र्वर देवस्थानने विनामुल्य उपलब्ध करुन दिले आहे. तर रक्तदानासाठी येणाऱ्या जिल्हा रक्तपेढीच्या वैद्यकीय टीमचा चहा, नाष्टा, जेवण यांची व्यवस्था दुर्गादेवी देवस्थाच्या सहकार्य करण्यात आली आहे. उर्वरित व्यवस्थांसाठीचा खर्च कर्मचारी वर्गणी गोळा करुन करणार आहेत.
याबाबत सुभाष पावसकर म्हणाले की, सणासुदीच्या काळात सातत्याने एस.टी. कर्मचारी संपावर जात असल्याने तालुक्यातील आमचा प्रवासीवर्ग नाराज आहे. पण त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा. एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून आणि संघटनांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक दायित्व निभावत असतो. संपूर्ण देश लॉकडाऊन असतान, खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसताना आम्ही कर्मचाऱ्यांनी अनेक अडकलेल्या प्रवाशांना थेट त्यांच्या राज्यात नेवून सोडले. आज आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. तरीही संप काळात रक्तदानाचा उपक्रम आम्ही घेत आहोत. तालुकावासीयांनी या शिबिरात सहभागी व्हावे. असे आमचे नम्र आवाहन आहे.
संबंधित बातम्या
मंगळवारी एस.टी. संप सुरूच रहाणार ?